ना. धनंजय मुंडेची भूमिका शैक्षणिक धोरणाच्या विरुद्ध

Beed

ना. धनंजय मुंडेची भूमिका शैक्षणिक धोरणाच्या विरुद्ध

दि. 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार - प्रकाश उजगरे

 बीड/प्रतिनिधी 

मागील दोन वर्षापासून स्वाधार योजनेची हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ना. धनंजय मुंडे यांनी अडवली आहे. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. महाविकास आघाडीने दलित विद्यार्थ्यांचा महाघात केला आहे. दलित विद्यार्थ्यां विरुद्ध राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची भूमिका नेहमीच असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. शिक्षणापासूनच दूर ठेवायचे असेल तर महाविकास आघाडी मध्ये आणि मनुवाद्यांना मध्ये फरक काय? शरद पवार, उद्धव ठाकरे हे मनुवादी विचाराचे आहेत. प्रबोधनकार ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, फुले आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्याने शिष्यवृत्ती बंद करणे कुठल्या विचारधारेत बसते. हे सर्व जातीवादी आहेत. हे दलितांनी समजून घ्यावे. हे सरकार दलित विरूद्ध आहे याचे पुरावे देण्याची गरज नाही. मागील दोन वर्षापासून स्वधार योजना योजनेचे पैसे न देऊन या सरकारने गोर गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे दरवाजे बंद करत आहेत. स्वाधार योजनेचे पैसे देऊन पुन्हा कार्यान्वित करावी यासाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रक जिल्हाध्यक्ष प्रकाश उजगरे यांनी दिले आहे. 

या धोरणाचा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष प्रकाश उजगरे यांनी विरोध केला असून याविरुद्ध 15 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड च्या समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, मागील दोन वर्षापासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेले नाही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, शरद पवार यांची भूमिका दिसते, मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून कसे दूर जातील याची खबरदारी समाज कल्याण विभाग घेत आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही, यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या वेळी मागील वर्षाची पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. सामाजिक न्याय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना तात्काळ स्वाधार शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ठाम निर्णय घेण्याची गरज आहे. फक्त आश्वासन देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल करू नये विद्यार्थी हिताचे निर्णय घ्यावेत. राष्ट्रवादीचे पुढारी जितेंद्र आव्हाड यांना फक्त मीडिया समोरच मागासवर्गीयांचा पुळका येतो परंतु कृती मात्र शून्य हजारो विद्यार्थ्यांची स्वाधार, शिष्यवृत्ती मिळाली नाही त्यावर ते काही बोलणार आहेत का?

Sharing

Visitor Counter