कोरो एकल महिला संघटना च्या बीड जिल्ह्याची महिलांची पर्यटन स्थळी अभ्यास भेट

Beed

कोरो एकल महिला संघटना च्या बीड जिल्ह्याची महिलांची पर्यटन स्थळी अभ्यास भेट

बीड/वार्ताहर 

एकल महीला संघटना ही मराठवाड्यात 19000 महिलासोबत आठ वर्षांपासून महिलांच्या अनेक प्रश्नावर काम करत आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, रूढी परंपरा,संपत्ती अधिकार वर करत आहेत. प्रामुख्याने पुरुषप्रधान संस्कृती मध्ये महिलांना अनेक बंधने घातली आहेत ज्या महिलांना परंपरेत मन मारून जगावं लागते अशा रूढींना छेद देण्यासाठी एकल महिला संघटना काम करत आहे. संघटना च्या लिडर्स बरोबर कोरोना काळात महिलांना बाहेर पडता येत नव्हते,संघटनाच्या महिलांच्या ऑनलाइन बैठका घेताना महिलांनी सहल काढण्यावर चर्चा केली आणि मागील वर्षांपासून एकल महिला संघटना ची ही तिसरी सहल महिलांच्या स्वतःच्या खर्चीतून स्वतः नियोजन करून सहल काढण्यात येते. ही सहल अशीच 43 महिलांच्या पुढाकाराने ऐतिहासीक माहिती मिळन्यासाठी, व स्वतः बाहेर पडून माहिती घेण्यासाठी एकत्र आल्या ही

लिडर्स महीलांनी चार दिवसाचा प्रवास खूप एन्जॉय केला बीड जिल्ह्यातील एकल महिला संघटना ची दरवर्षी अभ्यास सहलीचे आयोजन करन्यात येते यावेळी केज बस डेपो महामंडाळाचे अधिकारी, केजचे पत्रकार सौदागर सर, केज एकल महिला संघटना च्या तालुका अध्यक्ष सुनीता ताई साखरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहभाग केज तालुका अध्यक्ष सुनीता साखरे,वछला शिनगारे, प्रिया चाळक, सुशीला थोरात, पार्वती थोरात, शकुंतला थोरात, अक्षता पांडे,लक्ष्मी थोरात, सुमन थोरात, शशिकला थोरात, द्वारका थोरात, तस्लिम इनामदार, छाया राऊत, शांता बनसोडे, छबाबाई राऊत, वछला सत्वधर, सुरेखा गिरी, लता थोरात, महानंदा थोरात, सागर खटावकर, उर्मिला गालफडे,लता सावंत, तारा घोडके, नागरबाई लांडगे,चंपाताई कदम, मीरा नाईकवाडे, शारदा सोनवणे, चित्रा पाटील, रुक्मिणी नागापुरे, आशालता पांडे, कोमल, यांचा सहभाग होता

Sharing

Visitor Counter