केज तालुक्यात एका कुटुंबावर अज्ञातांचा हल्ला;हल्यात एक जनाचा मृत्यु

Beed

केज तालुक्यात एका कुटुंबावर अज्ञातांचा हल्ला;हल्यात एक जनाचा मृत्यु

केज / प्रतिनिधी 

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पांडुरंग नामदेव राऊत व त्यांच्या पत्नीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे . याबाबतची माहिती अशी की , केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील पांडुरंग नामदेव राऊत ( वय ५५ ) व त्यांची पत्नी ह्या वरप गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला रस्त्या लगत राहतात . दरम्यान दि . ११ जुलै रोजी सायंकाळी ७ : ०० ते ७ : ३० वा . दरम्यान त्या ठिकाणी काही अज्ञात लोक आले व पांडुरंग नामदेव राऊत यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढू लागले .त्यावेळी पांडुरंग राऊत यांनी केला आरडाओरडाअसता . त्या ठिकाणची लाईट बंद करून अज्ञातांनी पांडुरंग नामदेव राऊत धारदार शास्त्राने हल्ला चढवला यामध्ये ते गंभीर जखमी झाले . त्यांच्या पत्नी शशिकला पांडुरंग राऊत यांच्यावरही हल्ला केला त्यामध्ये त्या देखील गंभीर जखमी 2 झाल्या आहेत . सदर घटना घडल्यानंतर जखमींना तात्काळ केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी पांडुरंग नामदेव राऊत यांना मृत घोषित केले . व शशिकला राऊत यांच्यावर उपचार चालू आहेत . दरम्यान सदरच्या घटनेची सर्वत्र खळबळ माजली असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे , पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग पोलीस नाईक राजू गुंजाळ हे घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात नाकाबंदी केली ची माहिती देण्यात आली . सदरील हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप झाले नसून पोलीस पुढील कारवाई करत आहेत .

Sharing

Visitor Counter