शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती करण्यासाठी जनजागृती अभियान!

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती करण्यासाठी जनजागृती अभियान!
के.एस.के. काकू कृषी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे काकडहिरा गावात स्वागत.
बीड/प्रतिनिधी.
ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम-२०२२ राबवण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत अनंत कृषी प्रतिष्ठानाचे सौ. के. एस. के. काकू कृषी महाविद्यालय येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचे काकडहिरा गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ग्रामीण जागृकता कार्यानुभव अंतर्गत प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतात जाऊन देण्यात येणार आहे. यामध्ये बीज प्रक्रिया व त्याचे फायदे,माती परीक्षण का करावे, नवीन अवजारे, पीक नियोजन व शेतीविषयक शासनाच्या विविध योजना, निंबोळी अर्क कसे तयार करावे, पाणी व्यवस्थापन, उगवण क्षमता चाचणी, फळबाग तसेच विविध फळ झाडाचे कलम कसे करावे, इत्यादी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विविध ॲप्लीकेशन बद्दल माहिती देण्यात येणार आहे.
यामध्ये ॲग्रोटेक, वनामकृवि, कापूस व्यवस्थापन, फळबाग लागवड, हळद लागवड, एकात्मिक व्यवस्थापन, कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान, यासोबतच विद्यापीठाचे सर्व ॲप्लीकेशन कसे वापरायचे यासंबंधी शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल मध्ये आपलिकेशन घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे यामध्ये कृषिकन्या ऐश्वर्या आवाडे,पद्मजा काळखेर,उर्मिला पांचाळ,अखीला अवुला,शिल्पा थूपडू,ऋतिका एस. श्रीराज मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सचिव डॉ. जी. व्ही.साळुंके, प्राचार्य डॉ. एस. पी. मोरे, कार्यक्रम समन्वयक प्रा बी. डी. तायडे व काकडहिरा येथील निवडलेले कार्यक्रम अधिकारी प्रा वाघमारे पी. एस.मार्गदर्शन मिळणार आहे. तसे�
