बीड शहराला काका पुतण्यांनी बकाल करून सोडले

बीड शहराला काका पुतण्यांनी बकाल करून सोडले
ना रस्ते धड, ना गाटारी नीट वेळेवर मिळत नाही प्यायला पाणी
येणार्या निवडणूकीत बीडच्या नगरपालिकेवर शिवसंग्रामचाच झेंडा फडकणार-इम्रान जागीरदार
बीड/प्रतिनिधी
गेल्या 35 वर्षापासून डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांची सत्ता बीडच्या नगरपालिकेत आहे या 35 वर्षात करोडो रूपयची निधी आली आणि गायब झाली आता पुतण्या आमदार असुन निवडून येऊन तीन वर्ष होत आहे या तीन वर्षात काकाच्या हातावर हात मारत पुतण्याने ही विकासाचा ढोंग करत शहराचा तीन तेरा केला आहे या काका पुतण्याच्या जोडीने बीड शहराला बकाल करून सोडले असून आज अनेक मुस्लिम बहुल भागात ना रस्ते धड, ना गटारी, वेळेवर मिळत नाही प्यायला पाणी अशा या काका पुतण्याच्या जोडीला येणार्या निवडणूकीत बीड शहराची सुजाण जनता पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. बीडच्या नगरपालिकेवर शिवसंग्रामचाच झेंडा फडकेल
असे पत्रक शिवसंग्रामचे युवा नेते इम्रान जागीरदार यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, बीड शहरात आज अर्ध्या भागात चिखलच चिखल झाले आहे बीड शहराला बीड नवे आता चिखलबीड करून त्याचा नामकरण करणे गरजेचेच आहे. 35 वर्ष सत्ता भोगणारे नगराध्यक्षांनी शहरात काय दिवे लावले हे संपुर्ण शहरवासीयांना माहित आहे फक्त आलेल्या निधीचा कशया पध्दतीने वापर करून स्वतःच्या घर भरण्यात हे 35 वर्ष गेले 35 वर्षात शहरात ना रस्ते, ना गटारी, ना प्यायला पाणी, स्वच्छताचे तीन तेरा, पोल असेल तर लाईट नाही, लाईट असेल तर पोल नाही अशा पध्दतीने शहराला बकाल करून सोडणार्या या नगराध्यक्षांचा येणार्या निवडणूकीत बीडची जनता पाणी पथ केल्याशिवाय राहणार नाही. काकाच्या पाऊल व पाऊल ठेवत आमदार झालेले पुतण्या ही चलत असून नको त्याची राय आणि गरीबांची हाय घेण्यात हे आमदार सर्वात पुढे आहे. फक्त उद्घाटने करायचे, नारळ फोडायचे हा एकमेव उद्योग या आमदारांकडून होत आहे. होणार्या नगरपालिकेच्या निवडणूकीत या काका-पुतण्याच्या जोडीला बीडची सुजान जनता पाणी पाजल्या शिवाय राहणार नाही. बीडचा विकास मा.आमदार विनायकराव मेटेच करू शकतात. हे विश्वास बीडचे जनतेला असून आगामी होणार्या निवडणूकीत बीड शहरातून शिवसंग्रामचाच नगराध्यक्ष निवडून येईल आणि बीडच्या नगरपालिकेवर शिवसंग्रामचा झेंडा फडकेल असे ही इम्रान जागीरदार यांनी म्हटले आहे.
