राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी
Beed

येथील राष्ट्रीय प्राथमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवस चालणाऱ्या विशेष ध्वजारोहण कार्यक्रमांतर्गत आज दि.१३.०८.२०२२ रोजी सकाळी ठीक ०७.३५ वाजता आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका मा.डॉ.सौ. अदिती सुभाषचंद्रजी सारडा (गिलडा) यांचे हस्ते पहिल्या दिवसाचे ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारत स्वातंत्र्य संग्रामातील महापुरूषांच्या आठवणी जागृत करून त्यांना मानवंदना दिली. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तोष्णीवाल के बी व सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते. खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
