सिटीझन परिवाराच्या वतीने रूग्णवाहिकेचे लोकार्पण

सिटीझन परिवाराच्या वतीने रूग्णवाहिकेचे लोकार्पण 

बीड/प्रतिनिधी 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामाजिक बांधीलकी म्हणून सायं . दै . बीड सिटीझनच्या वतीने रूग्णवाहिकेचे लोकार्पण आज दुपारी १२.३० वाजता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे तहसीलदार सुहास हजारे , शहर ठाण्याचे पो.नि.रवि सानप यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी जेष्ठ समाजसेवक मोईन मास्टर , फारूक पटेल , अमर नाईकवाडे , सामाजिक कार्यकर्ते डॉ . गणेश ढवळे , मुखीद लाला , शेख अमर , गणेश तांदळे , शेख बिलाल , सय्यद असरार , अशपाक इनामदार , अय्युब पठाण , शेख खमर , शेख अखील , रोहिल दादा , राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष रेहाना पठाण , वाघमारे ताई यांची प्रमुख उपस्थिती होती . संपादक शेख मुजीब व सिटीझन परिवाराने उपस्थितांचे स्वागत केले . सायं . दै . बीड सिटीझनच्या वतीने लोकार्पण करण्यात आलेल्या रूग्ण वाहिकेच्या माध्यमातुन रूग्णांसाठी माफक दरात ही सुविधा उपलब्ध असणार आहे . यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संपादक शेख मुजीब , चंदन पठाण , रफीक पठाण , शेख वसीम , शेख तालेब , देवेंद्र ढाका , अनिल ससाणे , विक्रांत वीर , सय्यद अर्शद , संदीप जगदाळे , कृष्णा फरताळे , योगेश नाईक , उबेद मोमीन , तौकीर मोमीन ,, नाहेद बागवान , शेख राजु , शेख आमेर , जावेद खान , फारूक खान , अय्युब शहा , चालक मुनीरभाई आदिंनी केले .

Sharing

Visitor Counter