मार्गदर्शन बबनभाऊ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली नवचैतन्य गणेश उत्सव होणार यंदा उत्सवात साजरा

Beed

मार्गदर्शन बबनभाऊ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली नवचैतन्य गणेश उत्सव होणार यंदा उत्सवात साजरा

अध्यक्ष स्वप्निल पुजारी, उपाध्यक्ष अनमोल भंडारी, कोषाध्यक्ष अंकुश वडुळकर तर सचिव गणेश विडेकरांची निवड 

परळी/प्रतिनिधी

परळी शहरातील प्रसिध्द असा गणेश मंडळ म्हणुन ज्या मित्र मंडळाचा उल्लेख करण्यात येतो तो म्हणजे मार्गदर्शक बबनभाऊ गित्ते असलेला नवचैतन्य गणेश मंडळ, शहरातील हालगे गल्ली येथील प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा नवचैतन्य गणेश उत्सव मंडळाच्या वतीने यंदा मार्गदर्शक बबनभाऊ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत यावेळी यंदाचे नवचैतन्य गणेश मंडळाचे अध्यक्ष म्हणुन स्वप्निल पुजारी यांची निवड करण्यात आली.

बबनभाऊ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 32 वर्षापासुन सामाजिक उपक्रम घेऊन मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात येतो. प्रमुख मार्गदर्शक बबनभाऊ गित्ते यांच्या नेतृत्वाखाली दि.16 ऑगस्ट रोजी आयोजीत करण्यात आलेल्या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी स्वप्निल पुजारी उपाध्यक्ष अनमोल भंडारी, कोषाध्यक्षपदी अंकुश वडुळकर, सचिवपदी गणेश विडेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी बैठकीस मार्गदर्शक अनिल दहातोंडे, जगजिवन लव्हारे, कैलास मोदानी, सुनिल मंत्री, विशाल उदगीरकर, सोमनाथ सलगरे सदस्य म्हणुन सागर विडेकर, मनोज वायचळे, आकाश वडुळकर, अर्थव दरगड, अजिंक्य देशमुख, गणेश गित्ते, शाम बजाज, पांडुरंग सातपुते, अमोल बोईनवाड, विवेक पुजारी, भागवत सुर्यवंशी, शुभम नरवणे, आनंद कोतावार, ऋतीक डिकले, सुकेश वायचळे, वैभव पुजारी, गणेश देशमुख यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Sharing

Visitor Counter