मोफत मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

Beed

मोफत मोबाईल दुरुस्ती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

बीड/वार्ताहर 

भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था बीड यांच्या मार्फत “मोबाईल दुरुस्ती” प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील प्रशिक्षण 01 सप्टेबर ते 30 सप्टेबर 2022 या 30 दिवसाचे असून हे प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणा दरम्यान राहणे, जेवण, चहा व नाष्टा या सोयी विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.

 या प्रशिक्षणा दरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणा बरोबर व्यक्तिमत्व विकास बँकेच्या विविध योजनांची माहिती, शासकीय योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल यशस्वी उद्योजकास भेट विविध प्रकारचे खेळ इत्यादी मधून उद्योजक घडविण्याचे प्रयत्न केले जातात. प्रशिक्षण सुरु करण्यासाठी 35 प्रशिक्षणार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नियम व अटी पुढील प्रमाणे :-उमेदवार हा ग्रामीण भागातील असावा, त्याचे वय 18 ते 45 दरम्यान असावे, उमेदवाराचे शिक्षण किमान सातवी पास असावे, कुटुंबाचे नाव दारिद्र रेषेखालील यादी मध्ये किंवा रोजगार हमी योजनेमध्ये 100 दिवस काम केल्याची प्रमाणपत्र असावे किंवा कुंटुंबातील व्यक्तीचे नाव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या बचत गटांमध्ये असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड व तीन पासपोर्ट फोटो, बँक पासबुक, पॅन कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखला (असेल तर), फोटो बचत गट पासबुक या योजनेचा जास्तीत जास्त लाभधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक प्रमोद निनावे यांनी केले आहे

अधिक माहितीसाठी भ्रमणध्वी क्रमांक सुरेश बोचकुरे 9764677968, संतोष काळेगावकर 9405272944 सय्यद चांद 9371771473 यांच्याशी संपर्क साधावा.

Sharing

Visitor Counter