ॲड. शेख शफीक भाऊंचा वाढदिवस समाजोपयोगी कार्याने साजरा करणार - शेख एजाज़,शिवाजी भोसकर

Beed

ॲड. शेख शफीक भाऊंचा वाढदिवस समाजोपयोगी कार्याने साजरा करणार - शेख एजाज़,शिवाजी भोसकर

बीड/प्रतिनिधी

एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊंचा वाढदिवस समाजोपयोगी कार्याने साजरा करण्यात येणार असून बिल्किस बानो वरील अन्याय व मेटे साहेबांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी व आतिशबाजी करू नये. असे आवाहन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बीड तालुकाध्यक्ष शेख एजाज़ खन्ना भैय्या आणि बीड शहराध्यक्ष शिवाजी भोसकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पञकातून केले आहे. 

      एआयएमआयएम पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले अॅड. शेख शफीक भाऊ यांचा वाढदिवस दरवर्षी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनता मोठ्या आनंदाने साजरा करतात. यावेळीही साजरा करण्यात येणार आहे. परंतु यंदा बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार करणाऱ्या व आजीवन कारावास भोगत असलेल्या नराधमांना गुजरात राज्यातील सत्ताधाऱ्यांनी त्यांची शिक्षा माफ करत कारावासातून सोडून दिले. शिवाय शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार विनायकराव मेटे यांचे अकाली झालेल्या अपघाती निधनामुळे यावेळी दुःखाची किनार आहे. म्हणून यंदा वाढदिवसानिमित्ताने कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा आतिषबाजी पक्षातर्फे ही करण्यात येणार नाही व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही याचे पालन करावे. वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून यात प्रामुख्याने जिल्हा रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान (मसाला भात) वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गरजू लोकांना अन्नधान्य वाटप, गरजू महिलांना साडीचोळी वाटप, पाली येथील इन्फंट इंडिया प्रकल्पातील मुला-मुलींना फळांचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय वृक्षारोपण ही करण्यात येणार आहे. या समाजोपयोगी उपक्रमात पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील होणार असून हे विधायक कार्य वगळता कोणीही बॅनरबाजी किंवा आतिश बाजी करू नये. असे आवाहन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष शेख एजाज खन्ना भैय्या आणि बीड शहराध्यक्ष शिवाजीराव भोसकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

Sharing

Visitor Counter