मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याचे आवाहन

मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याचे आवाहन
बीड/वार्ताहर
1 जानेवारी 2023 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी 230 बीड विधानसभा मतदार संघ नामदेव टिळेकर यांनी केले आहे.
बीड तालुक्यातील सर्व मतदारांचे मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडण्याची मोहिम दि. 2 ऑगस्ट 2022 पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कामात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांना सहकार्य करावे. किंवा https://www.nvsp.in, htts:// voterportal.gov.in व voter helpline app या लिंकव्दारे स्वत: फॉर्म न 6 ब ऑनलाईन भरुन द्यावेत व त्याची माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना द्यावी.
