जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यतायात्रेचा शुभारंभ

Beed

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यतायात्रेचा शुभारंभ

  बीड/वार्ताहर 

महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रा बीड तालुक्यामध्ये 2 सप्टेंबर 2022 रोजी दाखल झाली. सदर यात्रेचे स्वागत आणि उद्घाटन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे केले.

बीड जिल्ह्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा दिनांक 29 ऑगस्ट 2022 रोजी बीड जिल्हा दाखल झाली. आष्टी, पाटोदा, शिरूर, परळी, माजलगाव, गेवराई या तालुक्यात प्रचार व प्रसिद्ध करून स्टार्टअप व नवीन्यता यात्रेची व्हॅन आज बीड तालुका दाखल झाली. सदर कार्यक्रमात याप्रसंगी उद्घाटन जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते ध्वज दाखवून तालुक्यातील प्रचार व प्रसिद्ध कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संताष राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांना यात्रेविषयी व्हिडिओ दाखवून माहिती देण्यात आली.

या महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी व नवोद्योजकांनी सहभागी होऊन नवकल्पनाचे सादरीकरण करावे, असे आव्हान जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले.

त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड, शासकीय तंत्रनिकेतन बीड आणि आदित्य इंजीनियरिंग कॉलेज बीड येथे प्रचार व प्रसिद्ध कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड येथे सुमारे 214 विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन बीड येथे सुमारे 170 विद्यार्थी उपस्थित होते. राज्यातील नाविन्यता पूर्ण संकल्पना आणि नवोद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन्यता विभागांतर्गत "महाराष्ट्र राज्य नाविन्यता पूर्ण स्टार्टअप धोरण २०१८" जाहीर करण्यात आले आहे. सदर धोरणाच्या प्रभावी अंमलबजावण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी .ही नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यांमध्ये स्टार्टअप च्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता इन्क्यूबेटर्स ची स्थापना व विस्तार, गुणवत्ता परीक्षण व स्टार्टअप्सना अर्थसहाय, अँड चालेंज, स्टार्टअप विक यासारख्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यता, कल्पकता यांना भौगोलिकतेच्या मर्यादा नसतात त्या कुठे यशस्वी होऊ शकतात. नवकल्पनांना योग्य पाठबळ मिळण्याची अवश्यकता असते. परंतु काही वेळा योग्य मार्गदर्शना अभावी चांगल्या कल्पना प्रत्यक्षात उतरू शकत नाहीत. याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत, जिल्ह्यातील नागरिकांच्या नावीन्यपूर्ण नाव संकल्पनांना मुर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन दिनांक 29 ऑगस्ट ते ३ सप्टेंबर 2022 या कालावधीत तालुकास्तरावर करण्यात आलेला आहे. व जिल्हास्तरीय सादरीकरण व प्रशिक्षण सत्राचे तारीख व ठिकाण लवकर जाहीर करण्यात येईल.त्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य नवीन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.msins.in किंवा www.maharastartupyatra.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी तसेच शासनामार्फत वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या अद्ययावत माहितीसाठी जिल्हा कौशल्य ,विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीडच्या beed skill या अधिकृत फेसबुक पेजला लाईक करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ,बीड या कार्यालयात भेट द्यावी. अथवा 02442-299116 या क्रमांकावर संपर्क करावा. या कार्यक्रमप्रसंगी सहाय्यक आयुक्त सुशील उचलले जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, बीड व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर स्टार्ट व नाविन्यता यात्रेचे प्रणव पाटील, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य कुमावत महात्मा गांधी नॅशनल फेलो प्रतीक शाह, बाळकृष्ण यादव जिल्हा कौशल्य विकास समन्वयक आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम सहाय्यक आयुक्त सुशील उचले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी संपन्न झाला.

Sharing

Visitor Counter