बीडच्या स्वराज्यनगर भागात रस्त्याची दुर्दशा, नाल्यांची स्वच्छता हाेईना पथदिवे कायमचे बंद

बीडच्या स्वराज्यनगर भागात रस्त्याची दुर्दशा, नाल्यांची स्वच्छता हाेईना पथदिवे कायमचे बंद
भारत व्हिडीओच्या पाठीमागील नागरिकांच्या नागरिक समस्या सुटेनात
बीड/प्रतिनिधी
बीड शहरातील स्वराज्य कृष्णा बँक समोरील रस्त्याची दुर्दशा झाल्याने कृष्ण मंदिर गल्लीतील लोकांचे हाल होत आहे. रस्त्यावरून चालतांना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अपघात वाढत आहेत. नागरिकांनी रस्त्याच्या दुरूस्ती बाबत ओरड केली तर ट्रॅक्टरव्दारे मुरूम टाकला जातो परंतु तो पसरवलाच जात नाही. या भागात आजूबाजूला चांगले रस्ते झाले. परंतु कृष्णा बँकेच्या उजव्या बाजूचा रस्ता व कृष्णा मंदिर रस्त्याची अजुनही दुर्दशा आहे. त्या बरोबरच या ठिकाणचे पथदिवे बंद आहेत. या बाबत स्वराज्यनगर भागातील नागरिकांनी बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना यापूर्वी निवेदन देवुनही कोणतीच कार्यवाही झाली नाही.
या भागातील क्रमांक दोन नाल्याची वेळेवर साफ सफाई होत नाही जर नाल्यांची सफाई केली तर या नाल्यातील घाण रस्त्यावर तशीच टाकली जाते. ती उचलली जात नाही. त्यामुळे गल्लीतील पाणी भारत व्हिडिओच्या समोरील नाल्यात साठत असल्याने या भागात नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. या भागात कचरा गोळा करणारी घंटागाडी ही वेळेवर येत नसल्याने नागरिकांनी साठवलेला कचरा कुठे टाकावा असा प्रश्न निर्माण होतो. अनेक दिवस कचरा साठुन राहत असल्याने दुर्गंधी सुटते. नाली, रस्ता आणि कचऱ्या बरोबरच या भागात आठ दिवसाआड तरी कधी बारा दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने भर पावसाळ्यात पाण्याविना नागरिकांचे हाल होऊ लागले आहेत.त्यातच पाणी सोडण्याच्या वेळाही निश्चीत नसल्याने नागरिकांची धांदल उडत आहे.या भागात सध्या मोकाट कुंत्र्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असुन या भागातील १० लहान मुले व वृध्दांना कुत्र्याने हल्ला करून चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे मुश्कील होत आहे. या भागात मोकाट फिरणाऱ्या कुंत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रस्त्यावरील पथदीवे शोभेची वस्तु बनले असुन सध्या बंद आहेत. ते निदान नवरात्रोत्सवात तरी सुरू करावेत अशी मागणी या भागातील महिलांनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
