तलवाडा पोलिसांना हक्काची निवासस्थान हवीत!

Beed

तलवाडा पोलिसांना हक्काची निवासस्थान हवीत!

बीड/वार्ताहर

बीड जिल्ह्याच्या सीमेवर गेवराई तालुक्यातील सर्वात मोठे जिल्हा परिषद गट आसलेल्या तलवाडा गांवातील मोठा जनसंपर्क असलेले पोलीस स्टेशन आहे. या हद्दीत तलवाडा पोलीस ठाण्याचा कारभार ६० गांवाशी निगडीत असुन तसेच वाडी वस्ती,ताडेचा जनसंपर्क देखील असल्याने कामकाजाचा बोजा भरमसाठ वाढला आहे. तलवाडा पोलिस बांधवांची संख्या देखील संख्या देखील मोठ्या प्रमाणात असुन त्यांना राहाण्याची म्हणजे निवासस्थानाची व्यवस्था शुन्य आहे. म्हणून त्यांना जिल्ह्याच्या व तालुक्याच्या आप डाऊन करावे लागत आहे. मात्र हा न विलाज आहे. तलवाडा निवास करिता पोलीस काॅलनीसाठी नियोजित जागा असु त्या ठिकाणी संध्या गुराढोरांचा बाजार भरत आहे. त्या जागेची मोजणी होऊन तब्बल चार वर्ष होऊन देखील झाले आहेत. आता तरी बीडचे पालकमंत्री अतुल सावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता तरी तुम्हीं लक्ष द्या व होणारी हेळसांड थांबवा! अशी मागणी पोलिस प्रेमीकडून होऊ लागली आहे. 

तलवाडा पोलिसांसाठी निवासाकरिती उभारण्यात येणारी भव्य इमारतीचा नियोजित प्रस्ताव रखडला आहे. या प्रस्तावाकडे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याने लक्षच दिले नाही. त्यामुळे पुन्हा राज्य शासनाने कडून पोलिस कर्मचा-या मध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे. बीड - गेवराई या ठिकाणी हुन आपडाॅऊन करतात पोलीस काॅलनी नसल्याने तलवाडा पोलीसांना आज रोजी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तलवाडा पोलीस स्टेशन येथे दोन अधिकारी व 38 पोलीस कर्मचारी उपलब्ध आहेत. निजाम कालीन पासुन तलवाडा पोलीस स्टेशन ला मान्यता मिळाली आहे तेव्हा पासुन तलवाडा येथील पोलीस बांधवाना पाटबधारे काॅलनीत घर भाडेत्वावर दिले गेले आहेत मात्र आता ते घरे निर्जीव अवस्थेत असल्याने तिथे रहाने शक्य नाही. त्यामुळे तलवाडा पोलीसांना हक्काचे घर कधी मिळणार आशी चर्चा सर्व सामान्य नागरीकातुन होत आहे. तलवाडा पोलीस स्टेशनची निवास्थांनासाठी दोन एकर जागा उपलब्ध आहेत हि जागा पोलीस स्टेशचे नावावर आहे या जागेची पाहाणी करुन तलवाडा पोलीस स्टेशचे सपोनि मुंडे यांच्या काळात महाराष्ट्र पोलीस बाॅईज संघटनेच्या पदाधिकारी यांच्या उपस्थित मोजमाप करून अंदाजे चार वर्ष उलटले तरी आतापर्यंत हा प्रश्न निकाली लागला नाही. पोलीसांसाठी निवासाची व्यवस्था झाली तर फायदेशीर ठरेल की पोलीस स्टेशचे काही अंतरावर हि जागा रोड लगत आहे.

Sharing

Visitor Counter