कृषी पर्यवेक्षकाची निर्दोष मुक्तता;अॅड कृष्णाराव सयाजीराव पंडित यांचा युक्तीवाद

Beed

कृषी पर्यवेक्षकाची निर्दोष मुक्तता;अॅड कृष्णाराव सयाजीराव पंडित यांचा युक्तीवाद

बीड/वार्ताहर 

बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कृषी पर्यवेक्षकांनी युरियांच्या साठ पोत्यांची अफरातफरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली ज्यामध्ये एम ए हादी यांच्यावर रासायनिक खतांच्या 40 बॅग व युरियाच्या 20 बॅग अशा एकूण 60 बॅग स्वतःच्या मालकीच्या शेतामध्ये ठेवल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 च्या नियम 3 चा भंग करण्यात आला असा आरोप होता. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी एम ए हार्दिक कृषी पर्यवेक्षक यांना निर्दोष मुक्त केले आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की 2011 12 अंतर्गत एकात्मिक भरड धान्य विकास कार्यक्रम राबविताना युरिया वीस बँक रासायनिक खतं 40 बँक असे एकूण 60 बॅगी स्वतःच्या शेतामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्यावरून कृषी पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात यावी याकरिता तक्रार देण्यात आली होती

ज्यामध्ये दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर सरकारी पक्षातर्फे साक्षी पुरावे घेण्यात आले व आरोपी तर्फे एडवोकेट कृष्णाराव सयाजीराव पंडित यांनीकाम पाहिले . ज्यामध्ये एम ए हादी यांना निर्दोष मुक्त करण्यात आली असून सबळ पुराव्या अभावी हा निकाल देण्यात आला ज्यामध्ये एडवोकेट सुनील वडमारे व एडवोकेट नागेश तांबारे यांनी मोलाचे सहकार्य केले

 

Sharing

Visitor Counter