रिपाइंचे गायरान धारकांसाठी जिल्हाभर न्यायिक आंदोलन!

Beed

रिपाइंचे गायरान धारकांसाठी जिल्हाभर न्यायिक आंदोलन!

आक्रमक : आंदोलनास उपस्थित राहण्याचे राजू जोगदंड यांचे आवाहन

बीड / प्रतिनिधी

 महाराष्ट्रासह देशभरात गायरान धारकांच्या न्यायिक हक्काच्या आणि अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाइं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा रिपाइं प्रदेश अध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली येत्या बुधवार (दि.३०) रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व तहसिलसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात गायरान धारकांनी तसेच रिपाइं पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाइं जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड यांनी केले आहे.

       प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, दलित,भुमिहिन,आदिवासी, पारधी,गावकुसां बाहेरील उपेक्षित भूमिहीन लोकांच्या ताब्यात असणाऱ्या गायरान जमिनी शासनाने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.दलित कास्तक-यांना अतिक्रमण काढण्या संदर्भातील नोटीसा दिल्या जात आहेत. परंतु आम्ही सरकारला एक इंचही गायरान जमीन परत घेऊ देणार नाहीत.त्यामुळे सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसिलसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.दलित भूमिहीन शेतमजुरांच्या 1990 पासुन ताब्यात असणारी गायरान ह्या त्यांच्या हक्काच्या जमिनी आहेत. त्याचबरोबर 2010 पर्यंतच्या गायरान जमिनी नावे करण्यासाठी देखील रिपाइं पाठपुरावा करत आहे.राज्यातील गायरान जमिनी संदर्भात रिपाइंकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे.पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित "महाधरणे आंदोलनात" मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राजू जोगदंड यांच्यासह रिपाइंचे युवा नेते सचिन कागदे, किशन तांगडे, गोवर्धन वाघमारे, किशोर कांडेकर, अशोक साळवे, अविनाश जावळे, महादेव उजगरे, दिपक कांबळे,दशरथ सोनवणे, अरुण भालेराव, डॉ.नरेंद्र जावळे, धोंडीराम सिरसाठ, महेश आठवले, लक्ष्मण सिरसाठ,अरुण निकाळजे, बापू पवार, अविनाश जोगदंड, सुभाष तांगडे आदिंनी केले आहे.  

Sharing

Visitor Counter