निवडणुक मतदान व मतमोजणी केंद्राच्या परीसरात कलम 144 (2) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू-- जिल्हादंडाधिकारी

निवडणुक मतदान व मतमोजणी केंद्राच्या परीसरात
कलम 144 (2) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू-- जिल्हादंडाधिकारी
बीड/वार्ताहर
जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत व खुल्या वातावरणात पार पडावी. यासाठी निवडणुकीचे मतदान व मतमोजणी केंद्राच्या 200 मिटर परीसरात मतदानाच्या दिवशी 18 डिसेंबर 2022 आणि मतमोजणी 20 डिसेंबर 2022 या रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान व मतमोजणी होणा-या ठिकाणच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन सदर आदेश केले आहेत.
या आदेशानुसार खालीलप्रमाणे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्र परिसरात 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणे प्रतिबंध करण्यात आला आहे. परंतु जे मतदार मतदानासाठी रांगेत संबंधित मतदान केंद्रावर उभे आहेत. त्यांना हा आदेश लागू राहणार नाही. मतदान केंद्राच्या परिसरात ध्वनीक्षेपक वाजवणे, वाद्य वाजवणे, मिरवणूका काढणे यावर प्रतिबंध करण्यात येत आहे. शासकीय वाहना व्यतिरीक्त इतर अनधिकृत वाहनांना 200 मिटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
सदर आदेश निवडणूकीच्या कामाकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना वगळून लागू राहतील. हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयताचे अंत्ययात्रेसाठी लागू राहणार नाही असे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत ग्रामपंचायती नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे वगळलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या अशा सुमारे 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणकप्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका शांततेने व खुल्या वातावरणात पार पडाव्यात तसेच कायदा व सुव्यास्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करणेत आहेत.
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांचे दि. 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान आणि दि. 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार असून निवडणूक होणा-या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान व मतमोजणी प्रक्रिया नि:पक्षपाती व निर्भय वातारणात पार पाडण्यासाठी या क्षेत्रात सिआरपीएस 144 (2) कलम लागू करण्यात आले आहे.
