कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार येथे विद्यार्थ्यांचे विशेष शिबीरामार्फ़त प्रस्ताव स्विकारुन जात वैधता प्रमाणपत्र वाटप संपन्न

Beed

कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार येथे विद्यार्थ्यांचे विशेष शिबीरामार्फ़त प्रस्ताव स्विकारुन जात वैधता प्रमाणपत्र वाटप संपन्न

बीड/वार्ताहर 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालय “सामाजिक न्याय पर्व” साजरा करण्यात येत आहे, या अंतर्गत कालिकादेवी महाविद्यालय शिरूर कासार येथे जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव स्वीकारण्याचे व वाटप करण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात बीड जिल्हा जात पडताळणी समितीचे विधी अधिकारी श्री.श्रीकांत साबळे बार्टी समतादूत श्री.भीमा कानधरे यांनी जात पडताळणी प्रस्ताव स्वीकारून मार्गदर्शन केले. सदरील आयोजित शिबिरात शिरूर तालुक्यातील विविध महाविद्यालयातील श्री.पी.ए भांगे सर,प्रा. सय्यद के. एस सर,श्री.इंगळे आर.बी सर, श्री.क्षीरसागर.डी. यु. सर,प्रा. काळे.पी.आर सर,श्री.काशीद सर, श्री.परजणे.ए.बी सर, श्री.गंगणे.एस.डी सर,श्री सानप.ए.बी. सर, श्री डोंगरे सर, श्री माने सर व श्री मिसाळ सर आदी कर्मचारी उपस्थित होते.शिरूर तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया या सबंधी मार्गदर्शन करण्यात आले. याच बरोबरच विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचेही वाटप करण्यात आले.

जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष शिबीर राबविण्यात येत असुन संबंधित तालुक्यातील महाविद्यालयांनी या विशेष शिबीरामध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिपुर्ण प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाकडून कळविण्यात येत आहे.

Sharing

Visitor Counter