कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता देशाच्या सर्व सीमा आणि विदेशी वाहतूक बंद करून टाका 

Beed

कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका लक्षात घेता देशाच्या सर्व सीमा आणि विदेशी वाहतूक बंद करून टाका 

लॉक डाऊन लावणे तर दूर याचा विचार सुद्धा करू नका - शेख मोहसीन

बीड/प्रतिनिधी

प्रसिद्धी माध्यमाद्वारे पुन्हा एकदा कोरोनाचा संभाव्य धोका समोर येत असल्याने ही बाब लक्षात घेऊन देशाच्या सर्व सीमा आणि विदेशी वाहतूक बंद करून टाकावे तसेच लॉक डाऊन लावणे तर दूर याचा विचार सुद्धा करू नका असे आवाहन वजा मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

            याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, गेल्या पावणेतीन वर्षापूर्वी गेल्या कोविड 19 कोरोना च्या लाटेने व शासन प्रशासनाने वेळोवेळी लावलेल्या लॉकडाऊन मुळे आपल्या देशाचे आणि जनतेचे कधीही भरून न येणारे शारीरिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक असे जवळपास प्रत्येक क्षेत्रात अतोनात नुकसान झालेले आहे. जवळपास पावणेतीन वर्षानंतर आता कुठे आपल्या देशातील जनता यातून बाहेर निघायचा प्रयत्न करत असतानाच परत एकदा देशी-विदेशी प्रसिद्धी माध्यमातून कोरोनाने आपल्या शेजारील चीनमध्ये पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या बातम्या येऊन धडकत आहे. हे पाहता यापूर्वी लागलेल्या ठोकरेने केंद्र सरकार तसेच प्रत्येक राज्य सरकारने आतापासूनच सावधानता बाळगायला हवी. जेणेकरून आपण व आपला देश या कोरोना रुपी राक्षसाचा समर्थपणे बिमोड करू शकू. यासाठी देशात जिथे-जिथे आपल्या देशाची सीमा आहे त्या सर्व सीमा बंद करून टाकायला हव्यात तसेच जलमार्ग व हवाई मार्गातून परदेशी वाहतूकही पूर्णतः बंद करून टाकायला हवी. ज्याद्वारे आपल्या देशातील नागरिक इतर देशात जाता कामा नये व इतर देशातील नागरिकही आपल्या देशात येता कामा नये. एवढे पथ्य जरी पाडले तरी आपण या कोरोना रुपी राक्षसाला आपल्या देशात शिरकाव करू देणार नाही. याची अंमलबजावणी आता प्रत्येक राज्याच्या व देशाच्या सरकारांनी सतर्कपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. इतर देशांसाठी कठोर आचारसंहिता लावणे अत्यंत आवश्यक आहे. हे लक्षात घेता कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी देशाच्या सर्व सीमा आणि विदेशी वाहतूक बंद करून टाका तसेच लॉक डाऊन लावणे तर दूर याचा विचार सुद्धा करू नका असे आवाहन वजा मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख मोहसीन यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

Sharing

Visitor Counter