नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी

नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी
विद्यार्थ्यांनी गणितावरील विविध कलाकृती सादर केल्या
बीड/प्रतिनिधी
महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती शहरातील नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. ज्यात विद्यार्थ्यांनी गणितावरील वेगवेगळ्या कलाकृती सादर केल्या.
श्रीनिवास रामानुजन यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शालेय जीवनात कष्ट करत शिक्षण घेतले त्यांनी गणितामध्ये एकापेक्षा एक संशोधन केले ज्याचा लाभ आज फक्त आपल्या भारत देशालाच नाही तर जवळपास संपूर्ण जगाला होत आहे. अशा या महान गणितज्ञाच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गणितावर आधारित अनेक कलाकृती सादर केल्या. विविध कोनांचे प्रकार दर्शवणारी कलाकृती व उपक्रम सादर केले. पाचवी ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांनी त्रिकोण, चौकोन, वर्तुळ यांची विविधता दर्शविणारे उपक्रम तयार केले.
पाचवीच्या विद्यार्थ्यांनी १०, २०, ५०, १०० रुपयांच्या नोटा दाखऊन अंकाची माहिती दिली. कोनांची माहिती घड्याळाद्वारे दिली.
शाळेच्या प्रांगणात पार पाडलेल्या या कार्यक्रमात, प्राचार्य सिद्दीकी नवीद, गणित विषय शिक्षीका रेशमा हुसैनी व रेशमा खान याने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून गणित शिक्षीकांचे स्वागत केले. अशाप्रकारे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती नॅशनल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरी करण्यात आली यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
