वंचित च्या 'ईशारा महामोर्चा' मध्ये मराठवाड्यातून हजारो कार्यकर्ते जाणार -अशोक हिंगे

वंचित च्या 'ईशारा महामोर्चा' मध्ये मराठवाड्यातून हजारो कार्यकर्ते जाणार -अशोक हिंगे
बीड/प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विधानभवना वर दिनांक २७ डिसेंबर, २०२२ रोजी 'ईशारा महामोर्चा' चे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र सह मराठवाड्यातील हजारोच्या संख्येने सहभागी होत आहेत अशी माहिती. मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी दिली आहे.महाराष्ट्र शासनाने महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदा करावा. महापुरुषांचा सतत अपमान करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना त्वरित बडतर्फ करावे.
महाराष्ट्र शासनाच्या अधीन असणारे ग्रामविकास मंत्रालय व वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने गायरान जमीन व वनजमिनीवरील अतिक्रमण कायम करावे. सर्व झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क पट्टे देण्यात यावे. अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्याप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शैक्षणिक शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी. तसेच अनुसूचित जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांना स्वधार योजना लागू करण्यात यावी. शेतकन्यांच्या शेतमालाला उत्पन्नावर आधारीत (लागत मूल्य व ५० टक्के नफा) हमीभाव देण्याची तरतूद करण्यात यावी.सर्व सामान्य नागरिकांवर लादलेली २० टक्के वीज बिलावरील दरवाढ तात्काळ रद्द करावी. या व अन्य मागण्यांसाठी "ईशारा महामोर्चा' चे आयोजन केले आहे. सदर मोर्चा मध्ये आपल्या मराठवाडा विभागातून हाजारे कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांनी दिली आहे.
