"त्या" ट्रक मध्ये स्वस्त धान्य दुकानाचा माल? पोलिसांना अजून ट्रक सापडेना

"त्या" ट्रक मध्ये स्वस्त धान्य दुकानाचा माल?
पोलिसांना अजून ट्रक सापडेना
बीड/वार्ताहर
बार्शी नाक्यावर मजुराचा जीव घेऊन निघून गेलेला किंवा सोडून दिलेला ट्रक पोलिसांना सापडत नाही की पोलिसांना तो शोधायचा नाही असा प्रश्न पडतो कारण सदर ट्रक मध्ये गोरगरिबांच्या पोटात जाणाऱ्या अन्नाचे पोते असल्याचे समजते.उत्तराखंड मधील रहिवाशी असलेला मजुराचा जीव घेऊन बार्शी नाका येथून ट्रक पसार झाला होता सदर ट्रक पोलिसांनी सोडून दिल्याची चर्चा झाली त्यामुळेच की काय अद्याप पर्यंत ट्रक पोलिसांना सापडत नाही सदर ट्रक मध्ये स्वस्त धान्य दुकानातील माल जोकी गोरगरिबांच्या तोंडातून काढलेला होता असे समजते.
24 डिसेंबर रोजी शहरातील बार्शी नाका येथे एका ट्रकने उत्तराखंड येथील एका मजुराचा जीव घेतला होता या प्रकरणी स्थानिक रहिवाशांनी सदरील ट्रक व चालकाला पकडले असता तेथे कर्त्यावर आलेल्या "त्या" दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रकसह चालकाला जाण्याची मुभा दिली असल्याची चर्चा शहरात असून या ट्रकमध्ये गोरगरिबांच्या पोटातील स्वस्त धान्य दुकानातील अन्न जात असल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. गेवराई येथील एका मातब्बर राजकीय व्यक्तीच्या पीएचा तो ट्रक असल्याची चर्चा शहरात सुरू असून पोलिसांनी कोणाच्या आदेशाने तो ट्रक सोडला होता याचा अधिक तपास बीड प्रसार घेत असून लवकरच याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात येणार असून वाचकांची ही उत्कर्ष शिंगेला पोचली आहे.
