युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद- हभप बबन महाराज बहिरवाल

युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद- हभप बबन महाराज बहिरवाल
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने पाच जेष्ठ पत्रकारांचा केला सन्मान, दर्पण दिन केला उत्साहात साजरा
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात अनाथ आश्रम, वृध्दाश्रम, तसेच गरीब व अनाथ विद्यार्थांना शैक्षणिक मदत या सह गोरगरीब जनतेला मदत करून समाजोपोयोगी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असून इतर पत्रकार संघटनेने ही असे उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन हभप बबन महाराज बहीरवाल यांनी शुक्रवार दि ६ जानेवारी रोजी आष्टी येथील विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या दर्पण दिना प्रसंगी केले.
'दर्पण'दिनाचे औचित्य साधून आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे, प्रफुल्ल सहस्रबुद्धे, सीताराम पोकळे, उत्तम बोडखे, दत्ता काकडे यांचा फेटा बांधून शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप बबन महाराज बहिरवाल तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विनोद गुंडमवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शंकर देशमुख, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक उंबरकर, भगिरथ धारक आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अविनाश कदम यांनी केले तर जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे, प्रफुल्ल सहस्त्रबुध्दे, सिताराम पोकळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, गटशिक्षण अधिकारी सुधाकर यादव, शंकर देशमुख, राजेंद्र लाड, संतोष दाणी, जावेद पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम,उपाध्यक्ष निसार शेख, जावेद पठाण,आण्णासाहेब साबळे, किशोर निकाळजे, संतोष नागरगोजे, अक्षय विधाते, संतोष तांगडे, अमोल जगताप, प्रेम पवळ, संतोष दाणी, अतुल जवणे, सुरेश कांबळे, राजेंद्र लाड, अशोक मुटकुळे, तुकाराम भवर, शहानवाज पठाण यांच्यासह तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.बहारदार सुत्रसंचलन अमोल जगताप यांनी केले तर आभार अक्षय विधाते यांनी मानले
युवा पत्रकार संघाचे उल्लेखनीय कार्य जेष्ठ पत्रकारांचा सन्मान केल्याने इतरांसमोर आदर्श - तहसिलदार विनोद गुंडमवार
आष्टी तालुका युवा पत्रकार संघ नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून पत्रकार बांधव हे तालुक्यातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.युवा पत्रकार संघाने जेष्ठ पत्रकार बांधवांचा सन्मान करुन गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याने त्यांचा आदर्श नक्कीच तरुण पिढी साठी प्रेरणादायी असून युवा पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार तहसिलदार विनोद गुंडमवार यांनी काढले व यावेळी सर्व पत्रकार बांधवांना पुष्पगुच्छ देऊन पत्रकारांचा सन्मान केला.
