पत्रकार भागवत तावरे, अमजद खान, मोमीन सादेक अंबानी यांचा हृदयी सत्कार संपन्न

Beed

पत्रकार भागवत तावरे, अमजद खान, मोमीन सादेक अंबानी यांचा हृदयी सत्कार संपन्न

बीड/प्रतिनिधी

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार भागवत तावरे, पठाण अमजद खान आणि सामाजिक कार्यकर्ते मोमीन सादेख अंबानी यांचा सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हृदयी सत्कार करण्यात आला.

              लोकपत्रकार म्हणून सर्वसामान्य वाचकांच्या मनात मानाचे स्थान मिळवणारे भागवत तावरे यांना बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार नुकताच जाहीर झाला तसेच पत्रकार अमजद खान यांनाही अब्दुल राशेद सलीम आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर झाला आणि सर्वसामान्यांसाठी अहोरात्र धडपड करणारे सामाजिक कार्यकर्ते मोमीन सादेक अंबानी यांची ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्स च्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे या सर्वांचा हृदयी सत्कार मुहम्मदिया कॉलनी येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद इलयास यांनी एका कार्यक्रमात केला.    

             या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ तर प्रमुख पाहुणे म्हणून संपादक अमरजान पठाण आणि आसिफ मोमीन होते. या सत्कार प्रसंगी बोलताना पत्रकार भागवत तावरे म्हणाले की, आपण भारतीयांना अभिप्रेत असलेली लोकशाही सध्या आपल्या देशात अस्तित्वात आहे का ? की लोकशाही सोडून भलतेच काहीतरी सुरू आहे ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आज मुहम्मदिया कॉलनीच्या या परिसरातच पाहिल्यावर काय दिसते बघा ! रस्त्यांची अवस्था कशी आहे ? नाल्यांचा पत्ता नाही. पंधरा-वीस दिवसांनी नळांना पाणी येते. विजेचे खांब आवश्यकतेनुसार नाही. असे एक ना अनेक प्रश्न या वसाहतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून जसेच्या तसे पडून आहेत. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter