अजित पवार व धनंजय मुंडे मंत्री मंत्रीपदावर

Beed

राष्ट्रवादीत फूट;अजित पवारांसह तीस आमदार सरकारमध्ये सामील

अजित पवार व धनंजय मुंडे मंत्री पदावर

बीड वार्ताहर 

सध्या महाराष्ट्राचा राजकारण पेटल्याने वेगवेगळे बदल पाहण्यास मिळत आहे. शिवसेनेत फूट तर कधी भाकरी फिरवण्याचा शरद पवारांचा गेम तर आता राष्ट्रवादीत फूट होऊन सरकारमध्ये सामील होण्याचा अजित पवारांच्या निर्णयाने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडलाय. राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह अजित पवार राजभवनावर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे ९ मंत्री अजित पवार यांच्यासह शपथ घेण्याची शक्यता आहे. सध्या कळत असलेल्या माहितीनुसार अजित पवार यांनी शरद पवार यांना अल्टीमेटम दिला होता. मात्र पवारांनी हा अल्टीमेटम मान्य केला नसल्याने अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली असल्याचं कळत आहे.

आज सकाळपासूनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख आमदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयावर देखील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर आज दुपारी अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा तसेच राष्ट्रवादीच्या काही आमदारांच्या गाड्यांचा ताफा राजभवनाच्या दिशेने गेला. सध्या राजभवनात अजित पवार यांच्या शपथविधीची तयारी सुरू आहे. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे ९ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती कळतीये. सध्या या संपूर्ण प्रकरणाविषयी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बोलायला तयार नाहीत. पण आज संध्याकाळपर्यंत या सर्व घडामोडींवरचा पडदा उठेल असं बोलले जातंय.

 

आज शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची संभाव्य यादी

अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, बाबूराव अत्राम

 

 

 

 

 

 

 

 

Sharing

Visitor Counter