अनिलदादा जगताप यांच्यावर जिल्ह्याभरातील शिवसैनिकांच्या शुभेच्छा प्रेमाचा वर्षाव

Beed

अनिलदादा जगताप यांच्यावर जिल्ह्याभरातील शिवसैनिकांच्या शुभेच्छा प्रेमाचा वर्षाव

बीड, प्रतिनिधी  

अठरा पगड जातीच्या जन समुदायाला बरोबर घेऊन शिवसेनेची पेरणी बीडच्या गावागावात, वाडी, वस्ती तांड्यावरील घराघरात करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख मा. अनिलदादा जगताप यांची महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी मातोश्री निवास्थानी (मुंबई) येथे बीड जिल्ह्याचा प्रभारी म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर अवघ्या जिल्ह्याभरातील शिवसैनिकांमध्ये आनंदाची लाट उसळली.

 मा. अनिलदादा जगताप बीडमध्ये येताच बीड शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, तालूकास्तरावरील पदाधिकारी, शिवसैनिक निष्ठेचे पाईक अनिलदादा जगताप यांचा सत्कार करण्यासाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बीड येथे एकवटले. बीडमधील तळागाळातील सर्व शिवसैनिकांनी अनिलदादांवर शुभेच्छारुपी प्रेमाचा वर्षाव करत हार, फुले, बुके आणि मानाचा फेटा बांधून हृदय सत्कार केला. दरम्यान अनिलदादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

Sharing