गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे व्हीआयपी लॉन्स समोर अपघात; मोटरसायकलस्वार जखमी

Beed

गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे व्हीआयपी लॉन्स समोर अपघात; मोटरसायकलस्वार जखमी

बीड प्रतिनिधी

शहरातील तेलगाव नाका व्हीआयपी लॉन्स समोर मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या डिव्हायडर चे काम गुत्तेदाराच्या झालेल्या हलगर्जीपणामुळे एक दुचाकीस्वार अपघातात जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.

तेलगाव नाका व्हीआयपी  लॉन्ससमोर डिव्हायडर चे काम सुरू आहे. मात्र, या ठिकाणी लोखंडी रॉड, प्लेट्स आणि मोठा खड्डा उघड्यावरच सोडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या धोकादायक भागावर कोणतीही चेतावणी चिन्हे किंवा लाल कापड बांधलेलं नव्हतं. त्यामुळे हा रस्ता वापरणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

याच निष्काळजीपणाचा फटका एका मोटरसायकलस्वाराला बसला असून, तो लोखंडी रॉडला धडकून जखमी झाला आहे. अपघातामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, स्थानिक नागरिकांनी संबंधित गुत्तेदारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जबाबदार गुत्तेदारावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

Sharing

Visitor Counter