पेठ बीड भागात पत्त्याचे क्लब, मटका, गुटका, दारू विक्री तेजीत !

पेठ बीड भागात पत्त्याचे क्लब, मटका, गुटका, दारू विक्री तेजीत !
रोखणाऱ्यांचे हात बांधले; सैया थानेदार तो डर किस बात का ?
बीड प्रतिनिधी
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत एकीकडे गुन्हेगारी रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांच्याच काळात गुन्हेगारांनी यंत्रणेला रेशीम धागे बांधल्याने छोटी मोठी कारवाई दाखवत बड्या माफियांना खुले रान दिले असल्याचे चित्र पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिसत आहे. पत्त्याचे क्लब मटका चक्री जुगार गुटखा विक्री तसेच या भागातील बिर्याणी हाऊस मध्ये खुल्या दारू विक्री याकडे जाणून बुजून डोळेझाक केली जात आहे. एस पी नवनीत कावत पथक निर्माण करत अशा धंद्यांना कायमचे बंद करण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र सैया थानेदार तो डर काहे का? अशीच परिस्थिती पेठ बीड भागात निर्माण झाली आहे.
पेठ बीड भाग हा अवैद्य धंदे चालवणाऱ्यांचा माहेरघर बनवला आहे एकीकडे जिल्हाभरात अवैध धंदे विरोधात विशेष मोहीम राबवत या धंद्यांना बंद करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शर्तीचे प्रयत्न करत आहेत त्यांच्या कार्याला सहकार्य करण्याचे मानस येथील भ्रष्ट पोलिसांना दिसून येत नाही. या भागातील अनेक ठिकाणी पत्त्याचे क्लब, मटका, गुटखा, दारू विक्री, सर्रास सुरू आहे. उघड्या डोळ्याने काळे धंदे पाहणाऱ्या पोलीस यंत्रणाचे एस पी साहेब आपण काय करणार आहात. या ठिकाणी काही पोलिसांची नियुक्ती ही फक्त अशा काळे धंदे करणाऱ्या कडून वसुली करण्यासाठीच केली गेली आहे का ? असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गोरगरिबांच्या संसाराची राख रांगोळी करण्यासाठी पत्त्याचे क्लब व चक्री सारखे जुगार याच भागात फोफावत आहेत. तसेच मटका प्रचलित असणारा जुगार सर्व सामान्य नागरिकांच्या गळ्यात हड्डी बनला आहे प्रत्येक भागात मटक्याच्या नादी लागत अनेक गोरगरीब व व्यापारीही बरबाद होत आहेत. या धंद्यांना खतपाणी घालत मोठे करण्याचे काम पोलीस यंत्रणेकडूनच केले जात आहे का ? कोणताही अवैध धंदा चालवण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली जाते मग ठरवला जातो हप्ता! या हप्ते पुढे लोकांचे हाल दिसत नाहीत का ? एस पी साहेब मटक्याची हंडी फोडा तर गुटखा आवळा चक्री हद्दपार करा दारूची अवैध विक्री थांबवा या धंद्यामुळेच सामान्य कर्जबाजारी होत आत्महत्या करत आहेत. एस पी नवनीत कावत यांच्यासारखे स्वच्छ प्रतिमेचे व कर्तबगार तथा भ्रष्टाचाराला स्थान न देणाऱ्या अधिकारी बीडमध्ये असतानाही पेठ बीड भागात असे धंदे चालत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
