आ.बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील शाळा इमारत बांधकामसाठी चार कोटी रुपये मंजूर

Ashti

आ.बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून मतदारसंघातील शाळा इमारत बांधकामसाठी चार कोटी रुपये मंजूर

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत बीड जिल्ह्यातील शाळा इमारत व नवीन खोल्या साठी 14 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी चार कोटी रुपये आष्टी- पाटोदा -शिरूर मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या नवीन शाळा इमारत व नवीन खोल्या बांधकामासाठी मंजूर करण्यात आला आहे लवकरच हे काम सुरु होणार असून आष्टी तालुक्यातील टाकळसिंग, लोणी, आष्टी येथील मुलींची कन्या शाळा, पाटोदा येथील जिल्हा परिषद शाळा, डोंगरकिन्ही येथील जिल्हा परिषद शाळा या इमारत बांधकामासाठी चार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिली आहे .
आष्टी- पाटोदा- शिरूर मतदारसंघातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला माध्यमिक शाळेतील शाळा इमारत बांधकाम प्रश्न अखेर आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे, आष्टी - पाटोदा- शिरूर मतदार संघातील अनेक माध्यमिक शाळा इमारत बांधकाम हे जीर्ण झाले असून आष्टी- पाटोदा- शिरूर तालुक्यातील शाळा इमारत बांधकामासाठी पुढील प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे १)जि प माध्यमिक शाळा डोंगरकिन्ही ता पाटोदा १०० लक्ष रुपये
२)जि प माध्यमिक शाळा सौताडा ता पाटोदा ५ नविन शाळा खोली बांधकाम करणे ४० लक्ष रूपये
३)जि प माध्यमिक शाळा लोणी स ४ नवीन शाळा खोली बांधकाम करणे ३५ लक्ष रुपये
४)जि प माध्यमिक शाळा टाकळसिंग नवीन इमारत बांधकाम करणे ८० लक्ष रुपये
५) जि प माध्यमिक शाळा आष्टी (मुलींची) नवीन इमारत बांधकाम करणे १०० लक्ष रुपये असेएकूण चार कोटी रुपये जिल्हा परिषद नियोजन समिती अंतर्गत शाळा इमारत बांधकामासाठी मंजूर झाले असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी यांनी सांगितले आहे. सध्या महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरात कोरोणा आजाराचे महासंकट आहे त्यामुळे अनेक विकास कामे स्थगित करण्यात आली आहेत असे असले तरी अत्यावश्यक असणारी विकास कामे करण्यात येत असून मतदारसंघात विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासनाकडून आवश्यक तेथे वेळोवेळी निधी मंजूर करून घेऊन विकास कामे सुरु ठेवली जाणार आहेत. मतदारसंघातील ज्या शाळांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्या सर्व शाळा अनेक वर्षापासून जीर्ण झाल्या होत्या त्यामुळेच आपण स्वतः लक्ष घालून या प्रमुख गावातील शाळा इमारतीसाठी निधी मंजूर करून घेतला असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले. यापुढेही आपण ज्या शाळेसाठी खोल्या आवश्यक आहेेेत त्यासाठी प्रयत्न करू असे आ, बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

Sharing

Visitor Counter