रमजान ईद साध्या पद्धतीने घरातच नमाज पठण करुन साजरा करावा - याहीया खान

रमजान ईद साध्या पद्धतीने घरातच नमाज पठण करुन साजरा करावा - याहीया खान
गेवराई/प्रतिनिधी
कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती गंभीर होत आहे. परिणामी सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान ईद सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा, यावेळी घरातच नमाज पठण करावे असे आवाहन शिवसेनेचे तलवाडा सर्कल प्रमुख शेख रफिक भाई यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.
चंद्र दर्शन नंतर 25 मे या तारखेला रमजान ईद साजरी करण्यात येण्यार आहे. पवित्र रमजानच्या महिन्यात उपवास (रोजा) केलेले रोजच्या दिवशी सोडले जातील. दरम्यान रमजान ईद दरवर्षी मित्र परिवार, सर्व समाज बांधव एकत्र येवुन मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र यावर्षी देशावर कोरोनाचे गंभीर संकट आहे. यासाठी शासन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपण देखील प्रशासनाला सहकार्य करुन रमजान ईद या वर्षी साधेपणाने साजरी करावी. यावेळी सर्वांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी व आपल्या देशाला लागलेला हा कोरोना व्हायरसचे संकट हे लवकर समाप्त व्हावे, सर्वसामाजासाठी येणारी अडचणी दुर व्हाव्यात अशी रमजान ईदला घरात नमाज पठन करुन प्रार्थना (दुवा) सर्व मुस्लीम बांधवांनी करावी. तसेच जगभरात कोरोनाने थैमान घातले आसताना सामाजीक भान राखुन सोशल डिस्टन्सिंग ठेवून साजरी करावी, मशिदीमध्ये नमाज पठन करु नये व घरातचं नमाज पठन करावे, शासन आदेशाचे मुस्लीम बांधवांनी जबाबदारीने पालन करावे व देशासाठी आपले जिवाची पर्वा न करता लोकांचे रक्षन करणारे पोलीस प्रशासन, डाॅक्टर, सफाई कामगार, होमगार्ड व आन्य लोक यांच्या साठी देखील नमाज पठण करुन प्रार्थना (दुवा) करावी असे आवाहन लक्ष्मन सेना प्रमुख याहीया खान यांनी प केले आहे.








