महाराष्ट्र राज्यात कोरोना रूग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७; आज एकाच दिवशी १,१८६ रूग्णांचा डिस्चार्ज, May 25, 2020

महाराष्ट्रराज्यात कोरोना रूग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७; आज एकाच दिवशी १,१८६ रूग्णांचा डिस्चार्ज,
May 25, 2020
मुंबई: राज्यातील कोरोना बाधित रूग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. आज राज्यभरात २ हजार ४३६ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज आढळलेली रुग्णसंख्या काल आढळून आलेल्या रूग्णसंख्येपेक्षा कमी आहे. राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. राज्यात आज ११८६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत १५ हजार ७८६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३५ हजार १७८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आज एका दिवसात राज्यभरातून १,१८६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये सर्वाधिक ९०० रुग्ण मुंबई मंडळात सोडण्यात आले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ५०१, ठाणे ३३७, पालघर १६, रायगड ४६, नाशिक ४, जळगाव, ३, पुणे १०९, सोलापूर २, कोल्हापूर ३, सांगली ३, रत्नागिरी ९, औरंगाबाद ९४, जालना २, हिंगोली १, लातूर १०, उस्मानाबाद २, अकोला १७, अमरावती ४ आणि नागपूर २३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
३ लाख ७८ हजार चाचण्याः राज्यात आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या ३ लाख ७८ हजार ५५५ नमुन्यांपैकी ५२ हजार ६६७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ३० हजार २४७ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ३५ हजार ४७९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
मुंबईत ३८, पुण्यात ११ मृत्यूः राज्यात ६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला असून त्यामुळे एकूण मृतांची संख्या १६९५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ५४ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३८, पुण्यात ११, नवी मुंबईत ३, ठाणे शहरात २, औरंगाबाद शहरात २, सोलापुरात १, कल्याण डोंबिवलीमध्ये १, रत्नागिरीमध्ये १ मृत्यू झाले आहेत. याशिवाय बिहार मधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे. मृतांपैकी ४२ पुरुष तर १८ महिला आहेत.
जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी):
मुंबई महानगरपालिका: ३१,९७२ (१०२६)
ठाणे: ४५७ (४)
ठाणे मनपा: २७३९ (३८)
नवी मुंबई मनपा: २०६८ (३२)
कल्याण डोंबिवली मनपा: ९४१ (८)
उल्हासनगर मनपा: १८० (३)
भिवंडी निजामपूर मनपा: ९८ (३)
मीरा भाईंदर मनपा: ४७५ (५)
पालघर:१२० (३)
वसई विरार मनपा: ५९७ (१५)
रायगड: ४३१ (५)
पनवेल मनपा: ३६० (१२)
ठाणे मंडळ एकूण: ४०,४३८ (११५४)
नाशिक: १२३
नाशिक मनपा: १२९ (२)
मालेगाव मनपा: ७२१ (४४)
अहमदनगर: ५७ (५)
अहमदनगर मनपा: २०
धुळे: २३ (३)
धुळे मनपा: ९५ (६)
जळगाव: ३०१ (३६)
जळगाव मनपा: ११७ (५)
नंदूरबार: ३२ (२)
नाशिक मंडळ एकूण: १६१८ (१०३)
पुणे: ३६० (७)
पुणे मनपा: ५३१९ (२६०)
पिंपरी चिंचवड मनपा: ३१७ (७)
सोलापूर: २४ (२)
सोलापूर मनपा:५९९ (४०)
सातारा: ३१४ (५)
पुणे मंडळ एकूण: ६९३३ (३२१)
कोल्हापूर:२४४ (१)
कोल्हापूर मनपा: २३
सांगली: ७२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: १६७ (४)+
कोल्हापूर मंडळ एकूण: ५२७ (६)








