मोरफळी येथील क्वांराटाईन मधील गरजू कुंटूंबाला जिवनावश्यक वस्तूचे किटचे मराठवाडा लोक विकास मंच कडून वितरण

मोरफळी येथील क्वांराटाईन मधील गरजू कुंटूंबाला
जिवनावश्यक वस्तूचे किटचे मराठवाडा लोक विकास मंच कडून वितरण
धारूर (वार्ताहर )
आकरा दिवसा पासून पुणे येथून आलेले गडदे कुंटूंब शेतात क्वांराटाईन वर होते या कुंटूंबास कुठलीच मदत होत नसल्याने उपासमारीची पाळी येत होती हि बाब लक्षा त येताच सहायक समाज कल्यान आयूक्त व मराठवाडा लोक विकास मंच यांचे वतीने त्यांना जिवनावश्यक वस्तूचे किट देण्यात आले व शिक्षणा बद्दल,माहीती देण्यात आली.या कुंटूंबास अधार देण्याचे काम करण्यात
आले .
मोरफळी येथिल होम कोरोंन्टाईन कुटुंबाला मराठवाडा लोकविकास मंचची मदतबीड यांचे वतीने तालुक्यात परतलेले गडदे कुटुंब गावात आले खरे पण कोरोणा संसर्गाची काळजी व ग्रामपंचायत ने दिलेल्या सुचनाचे पालन करायचे म्हणून हे कुटुंब गेली 11 दिवसांपासून मोरफळी या गावातील माळरानात राहत आहे.हि मुंबई येथिल पञकार परमेश्वर गडदे यांनी सहा.समाज कल्याण आयुक्त डाॕ सचिन मडावी यांन दुरध्वनी व्दारे कळवली व वाॕटसाप वर वास्तव परिस्थिती चे फोटो टाकले. माझी मोठी बहीण तिचे तीन मुलं आणि छोटा भाऊ व त्याचं कुटुंब पुण्यातून आले आहेत. याठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. ना पाणी, ना रेशन, निवाराही नाही, रात्रीचं रानडुकरांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे लहान मुलांच्या जिवाला धोका आहे. त्यांना जागरन करावं लागत आहे. . याची दखल आपण घेतली तर त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो....यावर तातडीणे निर्णय घेऊन सहायक समाज कल्यान आयूक्त सचिन मडावी व बालकामगार प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी मराठवाडा लोकविकास मंचचे बाजिराव ढाकणे धारुर येथिल पञकार अनिल महाजन हे त्या कुटुंबाला पुढील एक महिना पुरेल ऐवढे अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तू घेऊन पोहोचले व गावाबाहेर शेतात जाऊन त्या कुटुंबाला मदत पोहोच केली त्यांच्या सोबत चर्चा करुण त्या कुटुंबाचे मनोबल वाढवले याची दखल गावचे सरपंच शेषेराव गडदे यांनी घेऊन त्यांची पाण्याची व्यवस्था केली.
या मदतीमुळे कुटुंबातील लहाण थोरांच्या मुखावर हास्य तरळले.त्यांनी या टिमचे कौतुक केले.पुण्याला चांगल्या फ्लॕट मध्ये राहणाऱ्या कुटुंबाला ११ दिवस निर्जन शेतात राहावे लागले त्यांचे अनुभव व करावा लागणारा संघर्ष ते सांगत होते
यावेळी सरपंच शेषेराव गडदे,उपसरपंच केशव गडदे बालकामगार प्रकल्पाचे शिक्षक राहुल घनघाव हे उपस्थित होते.मदती बाबत मोरफळी ग्रामपंचायत कार्यालयाने सहा.समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी बालकामगार प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी व मरठवाडा लोकविकास मंचचे बाजीराव ढाकणे पत्रकार आनिलजी महाजन यांचे अभार मानले.








