सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा गरीबांना केली मदत--मचींद्र काळे

Beed

सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा गरीबांना केली मदत--मचींद्र काळे

बीड/प्रतिनिधी

शहरातील रहिवाशी व मांग गारुडी समाजाचे जिल्हाध्यक्ष गोरख काळे यांचा वाढदिवस गरीब नागरिकांना मदत करुन साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
देशात सध्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गरीब, कामगार व वंचित घटकावर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने आर्थिक संकटात हा वर्ग सापडला आहे. त्यामुळे गोरख काळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर अनावश्यक खर्च न करता गरीब नागरिकांना मदत करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी पी.आय.विश्वास पाटील यांच्या हस्ते गरीब नागरिकांना मदतीचे वाटप करण्यात आले. यानंतर शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार उत्तम ओव्हाळ, गोरख काळे, संतोष कुऱ्हाडे, सुरेश अंकुशे, मेगराज काळे, तानाजी काळे सह आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter