धारूर शहरात चीन सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली
Dharur

धारूर शहरात चीन सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली
धारूर/इरफान शेख
धारूर शहरात चीन सीमेवर शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दीप लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
भारत-चीन सिमेवर चीन सैनिकाच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व पुष्प वाहून त्यांना अभिवादन करण्यात आले. दिप लावून अभिवादन करण्यात आले व यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी शहरातील राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.