शहिद हजरत टिपू सुलतान युवा मंचा कडून रक्तदान शिबीर संपन्न,तर 80 रक्तदात्यांनी दिले रक्तदान

Georai

शहिद हजरत टिपू सुलतान युवा मंचा कडून रक्तदान शिबीर संपन्न,तर
80 रक्तदात्यांनी दिले रक्तदान

शाहागड/प्रतिनिधी

रविवारी सकाळी आकरा वाजता शहिद हजरत टिपू सुलतांन युवा मंच अबंड शाखेच्या वतीने मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे यांच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान म्हणून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.यावेळी प्रमुख उद्घाटन म्हणून शहागडचे पोलीस उपनिरीक्षक हानुमंत वारे,माजी सरपंच सय्यद रफियोदी्न,हजरत टिपू सुलतान युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष एड. इरफान बागवान, रजियोदी्न पटेल, जम्मूसेठ तांबोळी,अमिताभ भोसले ,एकबाल शेख,सय्यदे इरफान, अकबर शेख,विनायक शिंदे, लक्ष्मण धोत्रे,कदीर चाचू ताबोंळी,अशफाक शहा,इरफान मामू,विलास मस्के,अबंड तालुका अध्यक्ष हजरत टिपू सुलतान युवा मंच जुनेद ताबोंळी, गेवराई अध्यक्ष बबू भाई शेख,उपध्याक्ष इमतियाज मनियार, सचिव आयाज बागवान,जावेद बागवान,यांनी फित कापुन या रक्तदान शिबीराचे उद्धघाटन फिजिकल डिस्टनस व मास्क सह सँनिटायझर ठेऊन केले. तसेच सर्व मान्यवराचे हार,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बीड जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेने तज्ञ डॉ यांनी 80 रक्तदात्यांचे रक्त संकलन केले.

Sharing