बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आज दहा लोक होत आहेत कोरोना मुक्त!
Beed

बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आज दहा लोक होत आहेत कोरोना मुक्त!
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील करोना चा वाढता प्रभाव लोकांना ज्यास्तच
भयभीत केला होता परंतु आज बीड जिल्ह्यातील कोरोना वर मात करणारे बीड जिल्ह्यातील लोकांचा आकडा वाढत असल्याने लोकांची चिंता कमी झालेली दिसत आहे व बीड जिल्ह्याला पुन्हा जिरो वर येण्याची प्रतिक्षेत सर्वच बीडकर आतुरतेनं वाट पहात आहेत.
कोरोना पासून बीड जिल्ह्यात 98 लोक बरे झाले तर बीड जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना ने मृत्यू झालेली व्यक्ती 3 आहेत व उपचार घेत असलेले व्यक्ती 10 आहेत आज पर्यंत एकूण 111 कोरोना बाधित रुग्ण बीड जिल्हायात आढळले होते.परंतु 111पैकी 98 लोक बरे झाले असुन आज बीड मध्ये फक्त 10 लोक कोरोना बाधित रूग्ण आहेत लवकरच आपण बीड जिल्ह्याला पुन्हा "जिरो" वर आणण्यात यश प्राप्त करू ,घरी राहा!सुरक्षित राहा!!