धारूर मध्ये जनप्रक्षोभ, सत्य मांडणाऱ्या दिव्य मराठीचे विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा धारूर मध्ये विविध पक्ष संघटना सामाजिक संस्था कार्यकर्ते प्रतिष्ठान यांच्याकडून निषेध

Dharur

धारूर मध्ये जनप्रक्षोभ, सत्य मांडणाऱ्या दिव्य मराठीचे विरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचा धारूर मध्ये विविध पक्ष संघटना सामाजिक संस्था कार्यकर्ते प्रतिष्ठान यांच्याकडून निषेध

किल्लेधारूर/प्रतिनिधी

औरंगाबाद येथे कोरोना संदर्भात सत्य लिखाण केले म्हणून दिव्य मराठीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रशासकीय यंत्रणेचा धारूर येथे विविध पक्ष संघटना, सामाजिक संस्था ,कार्यकर्ते ,प्रतिष्ठान, यांनी एकत्र येत निषेध म्हणून आम्ही दिव्य मराठीच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले . तसेच दिव्य मराठी च्या संपादक, रिपोर्टर यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे अशी मागणी तहसील प्रशासनास दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली .

औरंगाबाद येथे सुरू असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा बाबत दैनिक दिव्य मराठीने सत्य परिस्थिती मांडणारे वृत्त प्रकाशित झाले होते . यावर प्रशासनाने वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याच्या हेतूने व आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी चुकीच्या पद्धतीने दैनिकाचे संपादक, प्रकाशक व वार्ताहरावरच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . प्रशासनाच्या या मुजोरपणाचा जाहीर निषेध करीत दैनिका विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे पोलिस प्रशासनाने तात्काळ मागे घेण्यात यावी व या कार्यपद्धतीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा विविध संघटना, प्रतिष्ठान सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आला यावेळी तहसीलदार वंदना शिरोळकर यांना यांना . या वेळी शिवसेना, सकल मराठा समाज किल्ले धारूर, किल्ले धारूर युथ क्लब, कायकल्प फाउंडेशन, किल्लेधारुर श्री हर्ष प्रतिष्ठान ,राजमुद्रा सामाजिक संघटना, मोरया प्रतिष्ठान, मुस्लिम संघर्ष समिती सय्यद साजेद, किल्ले धारूर पत्रकार संघ,भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांच्यावतीने सामूहिकरीत्या निवेदन करण्यात आले.यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष बाळासाहेब कुरुंद, किल्ले धारूर क्लबचे सुरेश शिनगारे, सकल मराठा समाजाचे अतुल शिनगारे, कायकल्प फाउंडेशनचे दिनेश कापसे, श्री हर्ष प्रतिष्ठानचे विजय शिनगारे, राजमुद्रा संघटनेचे सुरेश शेळके, मोरया प्रतिष्ठान चे सुनील कावळे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सादिक इनामदार ,मुस्लिम संघ समिती , पञकार ,अनिल महाजन, सय्यद शाकेर, प्रकाश काळे परमेश्‍वर राऊत,सुनील कावळे, सचिन थोरात,महादेव देशमुख,नाथा ढगे, सतिश वाकूडे, रवी गायसमुद्रे अतूल शिनगारे, राजू मोरे , सूर्यकांत जगताप ,बालाप्रसाद जाजू, संतोष स्वामी, हनुमान बडे ,गोवर्धन बडे,अमोल ठोंबरे, जगदीश गोरे, राजू मोरे, अमर रुद्रवार ,उमेश पवार, बबलू सावंत ,रतन शेंडगे, सचिन सक्राते, धनंजय भावठाणकर, इरफान शेख ,सतिश पोतदार,संदिपान तोंडे, दिलीप सिरसट,सदानंद खिंडरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter