आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या धनादेशाचे वाटप
Dharur

आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या धनादेशाचे वाटप
किल्लेधारूर/प्रतिनिधि
धारूर तहसील कार्यालयात आज माजलगाव विधानसभेचे आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या हस्ते कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील २३ लाभार्थ्यांना २०००० रू धनादेशाचे वाटप करण्यात आले दरिद्र रेषेखालील कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्या नंतर तहसील कार्यालयातील निराधार विभागातून २०००० रू धना देशाचे वितरण करण्यात येते.
यावेळी आमदार प्रकशदादा सोळंके , जिल्हा कोषाध्यक्ष माधव निर्मळ, तालुका अध्यक्ष प्रा ईश्वर मुंडे, युवक अध्यक्ष नितीन भैय्या शिनगारे , गटनेते सुधीर शिनगारे, जी प सदस्य लालासाहेब तिडके तहसिलदार वंदना शिडोळकर, नायब तहसीलदार व कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते