भीमराव धोंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन कृषी महाविद्यालयात कृषी दिन साजरा

भीमराव धोंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन कृषी महाविद्यालयात कृषी दिन साजरा
कृषी महाविद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी येथील छत्रपती ,शाहू ,फुले ,आंबेडकर कृषी महाविद्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले .या प्रसंगी माजी आ.भीमराव धोंडे यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनंम्र अभिवादन करण्यात आले या वेळी सुदाम मुंडे (वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण आष्टी), जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे, एस बी मांडवे (उपकोषागार अधिकारी आष्टी, प्राचार्य श्रीराम आरसुळ यांनी पुष्प हार अर्पण करुन विनंम्र अभिवादन करण्यात आले. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या वेळी कृषी महाविद्यालय तर्फे गंगाई नगरात शंभर एकर वर तबल चार हजार वृक्षारोपण माजी आ.भीमराव धोंडे, सुदाम मुंडे (वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण आष्टी), जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे, एस बी मांडवे (उपकोषागार अधिकारी आष्टी, प्राचार्य श्रीराम आरसुळ , प्रशासन अधिकारी डॉ डी. बी राऊत, शिवदास विधाते, माऊली बोडखे, शंकर देशमुख, यांच्या हस्ते झाले. कृषी महाविद्यालय तर्फे मागिल दहा वर्षां पासुन गंगाई नगरमध्ये शंभर एकर वर तब्बल एक्केचाळीस हजार वृक्ष लावण्यात आलेले आहेत. आज या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे आर टी बांगर (वनपाल), एम एम सावंत (वनरक्षक), आर डी शेळके(वनमजूर), एच बी शेख (वनमजूर), बेग नदीम (अॉपरेटर), प्राचार्य साईनाथ मोहळकर, प्राचार्य महेश झगडे उप प्राचार्य संजय बोडखे व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
