विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा!

Ashti

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केले, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा!

सांगवी आष्टी येथील घटना

आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज

हुंड्यातील राहिलेली रक्कम व इनोव्हा गाडी घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे आण या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आष्टी पोलिसांत पती, सासू व सासरा अशा तिघांविरुद्ध बुधवारी (ता. ३०) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तालुक्यातील सांगवी आष्टी येथील शिवानी ऊर्फ मोहिनी रामहरी खेडकर (वय २२ वर्षे) ही विवाहिता सोमवारी (ता. २९) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या प्रकरणी आष्टी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सोमवारी रात्री तिच्यावर सांगवी आष्टी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी मयत शिवानी खेडकर हिचे वडील जालिंदर गोरखनाथ शिंदे (रा. जवळा, ता. जामखेड, जि. नगर) यांनी मंगळवारी (ता. ३०) रात्री उशिरा आष्टी पोलिसांत फिर्याद दिली. शिवानी हिस पती रामहारी उद्धव खेडकर, सासरा उद्धव खेडकर व सासू शामल खेडकर यांच्याकडून तू तुझ्या आई-वडिलांकडून इनोव्हा गाडी घेण्यासाठी १२ लाख रुपये व हुंड्यातील राहिलेले एक लाख रुपये घेऊन ये म्हणून सतत शारीरिक व मानसिक देण्यात येत होता. तसेच छळ करून उपाशीपोटी ठेवून सतत मारहाण करण्यात येत असल्याने तिने या जाचास कंटाळून राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानुसार वरील तिघांविरुद्ध आष्टी पोलिसांत मंगळवारी (ता. ३०) रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती रामहारी उद्धव खेडकर, सासरा उद्धव खेडकर या दोघांना ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक माधव सूर्यवंशी हे पुढील तपास करीत आहेत.

Sharing

Visitor Counter