किल्ले धारूर शहरात युरिया खताचा तुटवडा

किल्ले धारूर शहरात युरिया खताचा तुटवडा
किल्लेधारूर/प्रतिनिधी
या वर्षी मान्सून वेळेवर बरसला आहे लागवड व पेरण्या वेळेवर झाल्या आता शेती पिकाला सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत त्यामुळे आता आवश्यकता आहे ती युरिया खताची मात्र धारूर बाजारात युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे
शेतकऱ्यांना लागणारे रासायनिक खत युरिया बाजारपेठतील दुकानांमध्ये उपलब्ध नसल्याचे चित्र दिसत आहे काही दुकानदारा कडे उपलब्ध आहे मात्र त्यात पण एका व्यक्तीस फक्त दोन खतांच्या पिशव्या मिळत आहेत शेतकऱ्यांचे शेतीतील कामे सोडून बाजारपेठेत चकरा माराव्या लागत आहेत. व दुकानासमोर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ ही खर्च होत आहे यामध्ये सध्या सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत सध्या पिकास युरियाचा खताची गरज आहे मात्र धारूर शहरात एक व्यक्तीस दोन च बॅग मिळत आहे शेतकऱ्याला आवश्यक असणारे खत उपलब्ध नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत दिसत आहेत तरी प्रशासनाने खताची उपलब्धता करून शेतकऱ्याला द्यावी