डिलिव्हरी वार्डातील वसुली करणाऱ्या मावश्यांना जिल्हाशल्य चिकीत्सकांचा दणका;एक सफाईगार निलंबित तर एकीची वडवणीला तडकाफडकी बदली

Beed

डिलिव्हरी वार्डातील वसुली करणाऱ्या मावश्यांना जिल्हाशल्य चिकीत्सकांचा दणका;एक सफाईगार निलंबित तर एकीची वडवणीला तडकाफडकी बदली

बीड प्रतिनिधी

जिल्हा रुग्णालयातील डिलिव्हरी वार्ड मधील डिलिव्हरी झाल्यानंतर पैसे घेण्याचा प्रकार समोर आला होता एका नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याचे चित्रफीत पुढे आले होते. शासनाकडून लाखो रुपयांची पगार घेत असतानाही जिल्हा रुग्णालयातील आलेल्या गोरगरिबाकडून पैसे वसुलीचा धंदा करत असलेल्या सफाई कामगारांवर जिल्हा शल्य चिकित्सक यांनी मंगळवारी उशिराने कारवाई करून एका कर्मचाऱ्याला निलंबित केले तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची वडवणी तालुक्यातील चिंचवन ग्रामीण ला तडकाफडकी बदली केली.

Sharing