लॉकडाऊन काळात प्रशासन व जनतेत सामंजस्य गरजेचे - आ. बाळासाहेब आजबे

Ashti

लॉकडाऊन काळात प्रशासन व जनतेत सामंजस्य गरजेचे - आ. बाळासाहेब आजबे 

आष्टी/ प्रतिनिधी 
बीड प्रसार न्युज.

कोरोना आजार संसर्गामुळे लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत आहे परंतु लॉक डाऊन वाढत असले तरी दैनंदिन कामकाज पूर्वपदावर आणण्याचे काम सरकारकडून केले जात आहे ,दैनंदिन कामकाज करत असताना  प्रशासन व जनतेमध्ये सामंजस्य राहणे गरजेचे आहे तरच आपण या महाभयानक महामारी चा सामना चांगल्या प्रकारे करू  शकतो असे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आष्टी तहसिल कार्यालयात आढावा बैठकीत बोलताना सांगितले,
  आज तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व विभागांच्या प्रमुखांची आढावा बैठक आ, बाळासाहेब आजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक 13 मे रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाली यावेळी तहसीलदार नीलिमा थेऊरकर , पोलीस उपनिरीक्षक माधव सूर्यवंशी ,आरोग्य अधिकारी कोठुळे साहेब, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे ,डॉ, जोगदंड ,डॉ, नितीन मोरे, डॉ, जाणवळे, डॉ, वायभासे, डॉ, क्षीरसागर, पवार साहेब, पांडे साहेब यांच्यासह सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील  कोरोना संसर्ग आजाराच्या उपयोजना विषयी माहिती घेऊन चर्चा करण्यात आली तर तहसील प्रशासनातील महसूल, कृषी, पाणीपुरवठा याबाबत आदी विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की आजपर्यंत आष्टी तालुक्यात सर्व अधिकाऱ्यांनी चांगले काम केले आहे. उत्तम प्रकारे आपण सर्व प्रकारच्या उपाय योजना राबवून कोरोना संसर्गाला रोखले आहे .यापुढेही  प्रशासनाने जनतेच्या सहकार्याने व आपण सर्वांनी मिळून लॉक डाउन काळात प्रशासनाच्या नियमावलीत बसून जनतेच्या अडचणी कशा सोडवता येतील याकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे .पोलीस प्रशासनाने जनतेला जास्त वेठीस न धरता त्यांच्या अडचणी समजावून घेऊन सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे तर जे विनाकारण बाहेर पडत असतील त्यांना शिक्षाही केली पाहिजे ,सर्व अधिकाऱ्यांनी प्रशासनाचा धाक दाखवून सहकार्याच्या भावनेतून लोकांशी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे जेणेकरून लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होणार नाही, प्रशासनाबरोबरच सर्वच राजकीय मंडळी सेवाभावी संस्था, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते या लढाईमध्ये आपापल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत त्यांनी आपले काम यापुढेही सुरू ठेवावे व आपला मतदारसंघ कोरणा पासून दूर कसा राहील यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान शेवटी आमदार बाळासाहेब आजबे यांनी केले.

Sharing

Visitor Counter