वक्फ अधिकाऱ्याला निलंबित करून गुन्हा दाखल करावा- रेहानाताई पठाण

वक्फ अधिकाऱ्याला निलंबित करून गुन्हा दाखल करावा- रेहानाताई पठाण
बीड/वार्ताहर
वक्फ अधिकारी भूमाफिया चा हस्तक असल्याचा व्हिडिओ वायर झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती आज राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष रेहनाताई पठाण यांनी व्हिडिओची सत्यता पडताळून गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की दैनिक बीड प्रसार मधील प्रसारित बातमी पाहिली असता स्पष्टपणे दिसून येते किं वक्फ अधिकारी बीड हे तक्रारदार महिलेला तीन फ्लॅट राहण्यासाठी देण्याचे आमिष देत आहेत जी अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे ज्यांच्या खांद्यावर वक्फ जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी आहे तेच चिरीमिरी पाई बिल्डरचे हस्तक बनून तक्रारदाराला प्रकरण मिटविण्यासाठी तीन फ्लॅटचे आमिष दाखवत आहेत जणू वक्फ अधिकारी हे शासनाचे नोकर नसून बिल्डरचे हस्तक आहेत याचा प्रथम तर मी समाजाचा एक जबाबदार व्यक्ती व एक प्रतिष्ठित पक्षाचा पदाधिकारी या नात्यानें तिव्र असा निषेध नोंदवतो,वक्फ जमिनी ह्या मुस्लिम समाजाची संपत्ती असून यात जर गैरकृत्य होत असेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे कुंपन हिथं शेत खाई या म्हणी प्रमाणे संरक्षणाचा अधिकार असलेले अधिकारीच कर्तव्यात कसूर करत असतील तर ही अत्यंत खेदाची व निंदनीय बाब आहे सदर बातमीच्या आधारे प्रसारित चल फित (व्हिडीओ क्लिप) वर खातेनिहाय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर शिस्तभंग कायद्यांतर्गत कडक कारवाई करत निलंबनाची कारवाई करण्यात यावी तसेच सदर अधिकाऱ्याची संपत्ती व मालमत्तेची कसुन चौकशी करण्यात यावी जेणेकरून सदर अधिकाऱ्यांनी शासन व बोर्डाला अंधारात ठेवून भ्रष्ट मार्गाने किती संपत्ती जमा केली हे सिद्ध होईल वरील चल फित (व्हिडीओ क्लिप) पाहिले असता असे लक्षात येते की सदर अधिकाऱ्यांसोबत वक्फ बोर्डातील इतर अधिकारी-कर्मचारी हे सुद्धा संगनमतात आहेत असे दिसून येते या व्हिडिओवर कसून चौकशी करत दोषी आढळणाऱ्या सर्व कर्मचारी, अधिकारी व बिल्डर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी पक्षातर्फे आम्ही मागणी करतो सदर निवेदनाची माननीय मंत्री महोदय तसेच वरिष्ठ अधिकारी साहेबांनी गांभीर्याने दखल घेत योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती अन्यथा लोकशाही मार्गाने जनजागृती करत समविचारी पक्षसंघटना यांना सोबत घेत जन-आंदोलन उभारून सदर घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष रेहाना ताई पठाण यांनी निवेदनात दिला आहे.