लाॅन टेनिस पंधरा दिवसीय प्रशिक्षण शिबीरात भाग घ्या - अॅड. महादेव धांडे

लाॅन टेनिस पंधरा दिवसीय प्रशिक्षण शिबीरात भाग घ्या - अॅड. महादेव धांडे
बीड/प्रतिनिधी
शहरातील अहेमदनगर रोडवरील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या चंपावती क्रीडा मंडळ येथे बीड जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन तर्फे दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते ११ जानेवारी २०२३ पर्यंत पंधरा दिवसीय लॉन टेनिस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष अॅड. महादेव धांडे यांनी केले आहे.
बीड जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन तर्फे व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली चंपावती क्रिडा मंडळ बीड येथे दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते ११ जानेवारी २०२३ या पंधरा दिवसादरम्यान दररोज संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत ५ वर्षापुढील विद्यार्थ्यांसाठी लॉन टेनिस प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. बीड जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन चे अध्यक्ष मा.आ. अमरसिंह पंडित व सचिव डॉ.बळीराम गवते यांनी हे शिबीर आयोजित केले आहे.
बीड शहरासह जिल्ह्यातील लाॅन टेनिस खेळू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी या लाॅन टेनिस प्रशिक्षण शिबीरात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन चे उपाध्यक्ष अॅड. महादेव धांडे यांनी केले असून शिबीरात भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडुंनी महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन चे मान्यता प्राप्त प्रशिक्षक शेख अतिक यांच्याशी ९७६७४१९८३० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे म्हटले आहे.
