जिजाऊच्या लेकीचा मोठ्या धाटात सन्मान सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ यांना राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित

जिजाऊच्या लेकीचा मोठ्या धाटात सन्मान सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ यांना राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित
बीड/प्रतिनिधी
आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने दि.१२ जानेवारी २०२३ संगम येथे जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला राष्ट्रमाता मॉ.जिजाऊ यांच्या प्रतिमेचे हार, घालून दीप, प्रज्वल, करून पुजन केले. किस्किंदा पांचाळ यांच्या हस्ते. व मनोगत व्यक्त केलें त्या म्हणाल्या राज्यातील स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांमुळे सामाजिक तसेच सांस्कृतिक वातावरण कुलूषित झाले आहे. सर्वत्रच मुली जन्माला येण्या अगोदरच त्यांची गर्भातच हत्या केली जात आहे. देशात अनेक ठिकाणी स्त्रीभ्रूण हत्यचे अक्षरश: उद्योग सुरू झाले आहेत. ही बाब गंभीर आहे. हे प्रकार असेच चालू राहीले तर मुलींच्या प्रमाणात प्रचंड घट होईल. या प्रकाराला निदान व गर्भपात करणारे डॉक्टर्स जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच मुलगी नको म्हणणारे देखील जबाबदार आहेत. त्यामुळे याविषयी व्यापक चळवळीची गरज आहे. समाजातील सामाजिक स्थैर्य टिकविण्यासाठी स्त्री जन्माचे स्वागत करावे, यासाठी समाजाने मानसिकता बदलण्याची गरज आहे. जिजाऊ रत्न पुरस्काराने सामाजिक कार्यकर्त्या तथा संस्थापक अध्यक्षा विश्वकल्याण सेवाभावी संस्था बीड. किस्किंदाताई पांचाळ यांना सामाजिक व महिलांविषयी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिजाऊ रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात उत्साहात पार पडला
आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांनी आयोजित केलेल्या परळी जवळील संगम येथे काल दि.१२ जानेवारी गुरूवार रोजी सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख,पंचायत समिती गटविकास आधिकारी संजय केंद्रे,ग्रामिण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक मारूती मुंडे,बीड जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथ सोळंके,उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी,महेश बॅकेचे उपाध्यक्ष शिवरत्न मुंडे आदि उपस्थित होते. कार्यकर्माचे सूत्रसंचालन ह.भ.प.नामदेव महाराज गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी केले.
राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल किस्किंदाताई पांचाळ यांच्यावर हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षांव होत आहे