जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधी वाढला ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यत आदेश लागू

Beed

जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांचे आदेश जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधी वाढला  ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यत आदेश लागू.

 बीड/प्रतिनिधी 

राज्य शासनाने दिनांक ३१ में २०२० रोजी पर्यत लॉकडाऊनचा कालावधी वाढवलेला  यामुळे यापूर्वी लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यत लागू राहतील असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. 

यापूर्वीच्या आदेशान्वये बीड जिल्हयात फोजदारी
प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१) (३) अन्वये दिनांक १७ में २०२० रोजी रात्री १२.०० वा. पर्यंत मनाई आदेश  लागू करण्यात आले होते.

या आधीच्या सर्व आदेशाप्रमाणे ज्या बाबी सम आणि विषम तारखांना अनुज्ञेय होत्या त्या यापुढेही
३१ में २०२० पर्यंत याच पध्दतीने अनुज्ञेय राहतील. परंतु  पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात सर्व पान टपरी,पान शॉप, तंबाखू, पानमसाला इत्यादींची विक्री व दारुची सर्व प्रकारची दुकाने बद राहतील, असे  स्पष्ट निर्देश पुन्हा  देण्यात आले आहेत.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करुन खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार
अधिसूचना निर्गमित केलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिलाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.

यापूर्वी  वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अमंलात राहतील असे निर्देशीत केले आहे. 

Sharing

Visitor Counter