बीड जिल्ह्यात आणखी सात रुग्ण कोरोना पाॅजीटीव !

बीड जिल्ह्यात आणखी सात रुग्ण कोरोना पाॅजीटीव
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या माहितीवरून हे सात कोरोन पॉझिटिव्ह रुग्ण नवी मुंबई येथून आलेले हे लोक मुळ रहिवासी पिंपळगाव तालुका जिल्हा नगर येथील रहिवासी असून यांना त्याठिकाणी पास न भेटल्यामुळे हे लोक आष्टी तालुक्यातील सांगवी याठिकानची त्यांची सुन असल्याने व बीड सेफ असल्यामुळे यांना आष्टी तालुक्यातील सांगवी या पत्त्याचा पास मिळाला होता म्हणून हे बीड जिल्ह्यात दाखल झाले.
आलेले सात ही रूग्ण नवी मुंबई येथून आलेले आहेत हे मुळ रहिवासी पिंपळगाव तालुका जिल्हा नगर या ठिकाण चे आहेत यांना नगर जिल्ह्याचा पास न मिळाल्याने व यांची सुन बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी या गावाची होती त्यामुळे यांना बीड जिल्ह्याचा पास मिळाला होता.हे रूग्ण बीड जिल्ह्यात १३ तारखेला दाखल झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांनी दिली.








