गेवराईत अडकलेल्या उत्तरप्रदेशाचे १५ नागरीक गावाकडे रवाना
Georai

गेवराईत अडकलेल्या उत्तरप्रदेशाचे १५ नागरीक गावाकडे रवाना
गेवराई/प्रतिनिधी
अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीजी यांच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार गेवराई भागात अडकलेल्या उत्तरप्रदेशातील १५ नागरिकांना बीड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.निवास बेदरे व हिमाचल प्रदेश प्रभारी रजनीताई पाटील यांच्या सूचनेनुसार उत्तरप्रदेशला जाण्याची आज बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली.व आज दुपारी १.०० वा. गेवराई येथुन एस.टी.बसने आैरंगाबाद येथे रवाना करण्यात आले असून तेथुन त्यांना रेल्वेने उत्तर प्रदेश साठी रवाना करण्यात येईल.








