बीड जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज!

नागरिकांनी कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज!
(बीड प्रसार न्युज)
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर लोकांची खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली असुन त्यातली त्यात बीड जिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने बीड जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी लोक कोरोनाला गांभीर्याने घेताना दिसत आहेत तर काही ठिकाणी अजून देखील कोरोनाला गांभीर्याने घेतलं जात नाही.
बीड जिल्हा प्रशासनाने अशी काटेकोरपणे प्रयत्न करून देखील काल दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव आले असुन जिल्ह्यात खळबळ उडाली आहे काही भागात तर भीतीचे वातावरण निर्माण झाले तर काही भागात सर्ररास लोक रोडवर खरेदी करताना दिसत आहे.
नागरिकांनी अजून कोरोनेला गांभीर्याने घेण्याची गरज आहे
कारण आज पर्यंत आपण हे बोलत होतो की आजुन आपल्या जिल्ह्यातील कोरोना आलेला नाही परंतु अता कोरोना ने आपल्या जिल्ह्यात शिरकाव केला असुन आता आपल्या जिल्ह्यात धोक्याचे वळण ज्यास्तच झालेली आहे.
प्रशासन वारंवार दुकानदारांना सांगून देखील दुकानदाराकडून सोशल डिस्टन्स पाळण्यात येत नाही, तोंडाला मास वापरा परंतु लोक वापरताना दिसत नाही, विनाकारण लोक घराबाहेर पडताना दिसत आहेत याचा विचार स्वतः आपण केलं पाहिजे. प्रशासनाला नाव ठेवून काय फायदा आपण काय वागतो हे पाहा विनाकारण घराबाहेर पडु नका घरीच राहा प्रशासनाला मदत करा.








